NC Times

NC Times

वाघोली तलाव टेंभूच्या पाण्याने हाऊसफुल्ल,सरपंच सौ साधना शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-वाघोली (ता कवठेमहांकाळ) परिसरातील पाण्याची स्थीती ही अत्यंत गंभीर झाली असुन,येथे तीव्र पाणी टंचाईला समोर जावे लागत आहे.येथे पिण्याच्या पाण्याचा ,जनावरांच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा अत्यंत गंभीर झाल्याने वाघोली (ता कवठेमहांकाळ) येथील पाझर तलाव हा तात्काळ टेंभूच्या पाण्याने भरावा अशी मागणी लोकनियुक्त सरपंच सौ साधनाताई शिंदे यांनी प्रशासनाकडे सातत्याने लावून धरण्याने,त्या मागणीला यश आले असून,वाघोली येथील तलाव हा टेंभूच्या पाण्याने हाऊसफुल्ल भरण्यात आला आहे.त्यामुळे परिसरात एकप्रकारे आनंदाचे वातावरणच निर्माण झाले आहे. 
सदर तलाव टेंभूच्या पाण्याने भरल्याने पिण्याच्या पाण्याचा,जनावरांच्या पाण्याचा व काही प्रमाणात शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागणार आहे.त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.याकामी सरपंच सौ साधना शिंदे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.