NC Times

NC Times

योग्य आहार घेऊन व भरपूर व्यायाम करून देखील वजन कमी होत नाही?


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)-मग या चुका तर करत नाही ना आपण कठोर व्यायाम करून तसेच योग्य आहार घेऊन देखील बऱ्याच लोकांचे वजन कमी होत नाही तर असं असू शकत कारण---- लठ्ठपणा कोणालाही आवडत नाही व लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो तरी देखील म्हणावा असा फायदा आपल्याला मिळत नाही नक्कीच आपण यापैकी चुका करत असाल त्यामुळे आपले वजन कमी होत नाही.                                                              खालील चुका टाळा...                                       कॅलरी योग्य पद्धतीने न घेणे... बऱ्याच वेळा आपण भरपूर व्यायाम करून विचार करतो की आपण बारीक होऊ किंवा सडपातळ होऊ शकतो परंतु जर आपण जेवढ्या कॅलरीज बर्न करणार आहोत तेवढ्याच खाणार असाल तर वजन कमी होणे अशक्यच आहे.                             दारूचे व्यसन...
आपल्याला आरोग्यासाठी दारू किती धोकादायक आहे हे सांगण्याची गरज नाही. तसेच अल्कोहोल हळूहळू शरीराला कमकुवत व आळशी बनवते. आळशीपणा...
लठ्ठपणा कमी करण्याची लढाई तोपर्यंत जिंकता येत नाही तोपर्यंत आपण आळशी आहोत. व्यायामाबरोबर आपली दिवसभरात हालचाल असणे गरजेचे आहे.                सतत ट्रेस घेणे... एका अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे की तणावामुळे शरीरात विशिष्ट हार्मोन्स मध्ये वाढ होऊ शकते यामुळे तुमचे पचन व्यवस्थित न झाल्यास आपले वजन कमी होण्याची किंवा पोटावरील चरबी कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे. आपण तणावाचे नियंत्रण करण्यासाठी ध्यान करू शकतो.                              डायट मध्ये प्रोटीनची कमी...
वजन कमी करण्यासाठी आपण आहार खूप कमी करतो व त्याबरोबरच आपल्याला डायट मध्ये प्रोटीनची कमी भासते ज्या मधून आपल्याला अधिक ऊर्जा मिळते तेच आपण आहारामध्ये कमी केल्याने आपले चयापचय देखील कमी होते. जरी वजन कमी झाले तरी आपले स्नायू कमकुवत होतात व त्यानंतर त्याचे नुकसान समोर येण्यास सुरुवात होते आपल्याला अधिक ऊर्जा मिळते तेच आपण आहारामध्ये कमी केल्याने आपले चयापचय देखील कमी होते जरी वजन कमी झाले तरी आपले  स्नायु कमकुवत होतात व त्यानंतर त्याचे नुकसान समोर येण्यास सुरुवात होते पूर्ण झोप न घेणे...
करोनाच्या काळात याचा थेट परिणाम हा तरुण वर्गावर झाला आहे उशिरापर्यंत जागणे सकाळी लवकर उठणे आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे कमी झोपेमुळे आळस व जंक फूड खाण्याचे देखील तीव्र इच्छा होईल या दोन्ही गोष्टी शरीरासाठी हानिकारक आहे त्यामुळे आपण सहा ते आठ तास तरी किमान झोप घेणे गरजेचे आहे       वेट लिफ्टिंग सारखे व्यायाम प्रकार...
वजन कमी करण्यासाठी बऱ्याच लोकांना वाटते की वजन उचलण्याचा व्यायाम फारसा फायदा देत नाही परंतु वजन कमी करण्यासोबत स्ट्रेंथ आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी हे व्यायाम प्रकार मदत करतात खास करून पोट आणि मांडी वरची चरबी कमी करण्यासाठी आपण वेट लिफ्टिंग चे व्यायाम प्रकार करू शकतो आपली दिनचर्या ,आपला आहार ,आपला व्यायाम, झोप, ताण -तणाव ,चुकीच्या सवयी व मनशांती अशा सर्व गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.