NC Times

NC Times

लोकमान्य टिळक ग्रंथालय वाई येथे कविराज अमोल मांढरे सन्मानित...


नवचैतन्य टाईम्स वाई(अमोल मांढरे )13.एप्रिल- दक्षिण काशी आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखला जाणाऱ्या वाई येथे. लोकमान्य टिळक ग्रंथालय येथे गुढीपाडवा निमित्त कवी संमेलनाचे आयोजन केले गेले. कार्यक्रम विविध कवींच्या सहभागामुळे नियोजनबद्ध आणि उत्साह पूर्ण वातावरणात पार पडले वाई शहर पंचक्रोशीतील विविध कवींनी अनेक सामाजिक विषय तथा प्रबोधन त्याचबरोबर निसर्ग आणि विनोदी विषयांवर स्वतःचे काव्य सादर केले. याच वेळी प्रसिद्ध साहित्यिक व पत्रकार कविराज अमोल मांढरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श स्वराज्य ही सर्वोत्कृष्ट कविता सादर केली. त्यांच्या या उत्कृष्ट काव्य सादरीकरणामुळे रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद आणि कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श स्वराज्य. व त्याची किंमत आजच्या घडीला आपल्या समाजात गरजेचेच आहे त्याचबरोबर युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा व त्यांच्या थोर विचारांचा आदर्श जपायला हवा असा भावार्थ त्यांनी आपल्या काव्यातून सादर केला.

कविराज अमोल मांढरे हे  किसनवीर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचे शिक्षण बीए मराठी असे असून त्यांनी साहित्यिक व पत्रकारिता क्षेत्रात एक उत्तुंग शिखर सर केलेले आहे. आणि याच क्षेत्र त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र ओळख देखील निर्माण केलेली आहे. त्याचबरोबर विशेष म्हणजे सहकार क्षेत्रात अग्रगण्य राहणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथील ते कर्मचारी आहेत.कवी संमेलना बरोबरच इतर सामाजिक प्रश्नांवरही त्यांनी महाराष्ट्रातील विविध वृत्तांत पत्रातून दर्जेदार लिखाणही केलेले आहे. त्याचबरोबर त्यांना अनेक साहित्य पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे.  आजच्या वाढत्या स्पर्धेत आणि जागतिकीकरणात तुम्ही कुठल्याही क्षेत्रात करिअर करून जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी आपली मातृभाषा मराठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श स्वराज्याची जाण कायम ठेवावी व त्याचे पावित्र्यही कायम राखावे..कविराज अमोल मांढरे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. कवी राज अमोल मांढरे हे साहित्य क्षेत्राबरोबरच पत्रकारितेचे क्षेत्रातही उत्तम पद्धतीने कार्यरत आहेत. त्याचबरोबर हिंदी साहित्य क्षेत्रातही परराज्यातही त्यांचे समाजप्रबोधनाचे कार्य चालूच आहे.             धन्यवाद
कविराज अमोल मांढरे वाई जिल्हा सातारा      Mobile.no.7709246740.