NC Times

NC Times

खरसुंडी येथील सिद्धनाथ यात्रेच्या निमित्त प्रशासनाकडून आढावा बैठक संपन्न


नवचैतन्य  टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजू शेख)-सुक्षेत्र खरसुंडी येथील सिद्धनाथ देवाची प्रसिद्ध  चैत्र यात्रा पाच मे रोजी संपन्न  होणार असून  यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी विभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील आणि आटपाडी तहसीलदार सागर ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाने  यात्रा नियोजन आढावा बैठक घेण्यात आले व विविध उपाय योजनेवर मार्गदर्शन केले आटपाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गायकवाड गटविकास अधिकारी मुक्तेश्वर  माडगूळकर  मार्केट कमिटी सभापती संतोष पुजारी उपसभापती राहुल गायकवाड लोकनियुक्त सरपंच धोंडीराम इंगवले वीज वितरण चे विष्णू  मंडले  संबंधित सर्व विभागाचे अधिकारी देवस्थान संचालक व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते


खरसुंडी सिद्धनाथ चैत्र यात्रा साठी येणाऱ्या भाविकांना पुरेशा सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यासाठी संमती सर्व विभागांनी योगदान देण्याचे आवाहन तहसीलदार सागर ढवळे यांनी केले. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन योग्य ते नियोजन करून काळजी घेईल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले

 आढावा बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे यात्रा तळ बैल बाजार झरे रोडला,रस्त्याचे चारही बाजूला पार्किंग व्यवस्था बायपास  रस्त्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याचा पुरेसा व्यवस्था यात्रा काळात ज्यादा एसटीची सोय याविषयी सविस्तर  चर्चा करण्यात आली.