NC Times

NC Times

घाटनांद्रेत हाजरत पिरसाहेब उरुस उत्साहात संपन्न


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक गणले जाणारया त्याचबरोबर महाराष्ट्र व कर्नाटक येथील बर्याच भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असणारे तसेच तेही एकत्रीत तीन मदार असणारे एकमेव अश्या घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील हाजरत पिरसाहेब दर्गायाचा उरुस मोठ्या भक्तीमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाला.हाजरत पिरसाहेबाच्या दर्शनासाठी दर्गा परिसरात भाविकभक्तांनी मोठी गर्दी केली होती.

सदर उरुसा निमित्ताने परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली होती.ती सर्वांचे मन वेधुन घेत होती.यानिमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
यामध्ये गंध व गलेप चढवणेसह  पिरास चादर अर्पण करण्यात आली.तर कार्यक्रमाची सांगता ही महाप्रसाद वाटपाने करण्यात आली.त्याचा लाभ तमाम भाविक भक्तांनी घेतला.कार्यक्रमाचे  संयोजन शफीक मुलाणी,अकबर मुलाणी,साहील मुलाणी,नादु मुलाणी, प्रविण उर्फ पप्पू गांधी,नवनाथ चव्हाण,पिंन्टू काळे,अमृत शिंदे, आयन मुलाणी,असद मुलाणी, आसिफ मणेर,अरबाज मणेरसह मित्रपरिवारानी केले.