NC Times

NC Times

कुची येथे आणल्या अयोध्याहुन चांदीच्या श्रीराम पादुका


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- गुढीपाडवा ते श्रीरामनवमी दरम्याने होणाऱ्या श्री ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायणाच्या पार्श्वभूमीवर कुची (ता कवठेमहांकाळ) येथील भावीक भक्तांनी अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील श्री प्रभु रामचंद्रच्या जन्मभूमीत जाऊन सुमारे सव्वा लाख रुपये खर्चाच्या श्रीराम पादुका आणल्या.त्याचे गावातील आबालवृद्धसह ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. 
कुची (ता कवठेमहांकाळ) येथे मोठ्या प्रमाणात धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपली जाते.दरसाल येथील हनुमान मंदिर परिसरात गुढीपाडवा ते श्रीरामनवमी दरम्याने श्री ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन केले जाते.यामध्ये आबालवृद्धांचा मोठा सहभाग असतो.या दरम्यान विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जातात.यामध्ये अखंड हरिनाम,वीणावादक प्रवचन, किर्तन, काकडा, जागर, भजन,आरती,महाप्रसाद याचा समावेश असतो.किर्तना दरम्यान महाराष्ट्रातील मोठमोठे महाराज किर्तन व प्रवचनासाठी येथे हजेरी लावतात. 
याच पार्श्वभूमीवरच गावातील जयवंतराव पवार,उत्तम पवार,तानाजी पाटील,विलास पाटील,सचिन पाटील,संभाजी पाटील,प्रदीप कुलकर्णी, हणमंत फाकडे,शिवाजी   पवार,नारायण सुतार यांनी अयोध्या येथे जावुन चांदीच्या    पादुका आणल्या.सदर पादुकांची गावातून सुवाद्य मिरवणूक काढली.याचे महिलासह ग्रामस्थांनी उत्साही स्वागत केले.