NC Times

NC Times

कवठेमहांकाळ येथील मसोबा देवाच्या यात्रेस प्रारंभ आज यात्रेचे मुख्यदिवस तर बुधवारी महाप्रसाद वाटपाने सांगता


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-        कवठेमहांकाळ शहरातील मध्यवर्ती मसोबागेट येथे असणार्या श्री म्हसोबा देवाच्या यात्रेस‌ प्रारंभ झाला असुन सोमवार दिनांक २९ रोजी श्रीची बोणी व नैवेद्य पार पडली तर आज मंगळवार दिनांक ३० हा यात्रेचा मुख्य दिवस असुन,यानिमित्ताने सकाळी श्री पुजाअर्चा,अभिषेक यासारखे कार्यक्रम पार पडणार आहेत.
 तर बुधवार दिनांक १ मे रोजी यात्रेनिमित्ताने मंदिर परिसरात सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.याचा लाभ तमाम भाविक भक्तांनी घ्याव असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
 यात्रेनिमीताने मंदिर परिसरात भव्य व आकर्षक आसा मंडप उभारण्यात आला असून आकर्षक अशी विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे.यानिमित्ताने सोमनाथ लाटवडे,जगन्नाथ शिंदे, विजय भोसले,    आण्णासाहेब       सुंगारे,भानुदास माने,चंद्रकांत बाबर,संजय बाबर,बाळू कांबळे,रुपेश वाघमारे,धनाजी जाधव,अशोक भाऊजी,  नंदकुमार जगताप,शरद कदम,तुकाराम सुतार,सलीम    भाई,अजित सुतार,गोमटेश बंधू,भंडारे बंधू,वसंत इंगळे  दता दोडमिशेसह मित्रपरिवार कार्यक्रमाचे संयोजन करीत आहेत.