NC Times

NC Times

साताऱ्यात राजेच्या विरोधात मी सर्वसामान्य माथाडी कामगारांचा उमेदवार देणार - मा.शरद पवार


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी (डॉ.अरुण राजपुरे)-साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे हे माथाडी कामगारांमध्ये अनेक वर्ष काम केलेले सहकारी कार्यकर्ते असून त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे साताऱ्यात राजा विरोधात कामगार नेता अशी लढत असेल, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.
बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी ही माहिती दिली. एका बाजूला राजा आणि दुसऱ्या बाजूला कामगारांमधील सर्वसामान्य कुटुंबातील सामान्य कार्यकर्ता असेल. माढा लोकसभा मतदारसंघातील मोठ्या प्रमाणावर तरुणांचा पाठिंबा असून या मतदारसंघांमध्ये अकलूज मधून काही सहकारी भेटायला आले. त्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव पुढे आले. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अकलूजमध्ये त्यांना प्रवेश देतील.पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर होईल.
दौंड तालुक्यात नामदेव ताकवणे यांनी आमच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला त्याचा मला आनंद आहे. भाजपचे अध्यक्ष हेच आमच्या पक्षात येऊन सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्यास तयार आहेत, ही महत्त्वाची बाब असून नवीन लोक जे येतात, त्यांचे स्वागत करून साखर कारखान्याचे राजकारणात अधिक लक्ष देण्याची आमची भूमिका नाही. हा कारखाना चालला पाहिजे. शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे अशी भूमिका आमची आहे, असे पवार म्हणाले.
सातारचा उमेदवार आमच्या अध्यक्षांनी जाहीर केला. माढा शशिकांत शिंदे सरकार माथाडी कामगारांच्या मध्ये अनेक वर्ष काम करणाऱ्या एका सहकाऱ्याला तिथे संधी दिली. तिथे मोठी गंमत होणार आहे. एका बाजूला राजा आणि दुसरीकडे माथाडी कामगार म्हणून ज्यांनी काम केले, असा सर्वसामान्य कुटुंबातला सामान्य उमेदवार अशी ही निवडणूक आहे. लवकरच याचे उमेदवारी अर्ज भरले जातील. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीची मोहीम सुरू होईल.