NC Times

NC Times

लंगरपेठ येथील दत्तात्रय सुर्यवंशी यांचे मान्यवरांच्या कडून अभिष्टचिंतन




नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-गावाच्या विकासासाठी उपसरपंच पदही कीती महत्त्वाचे  असते हे आपल्या कार्यातून दाखवून देणारे लंगरपेठ (ता कवठेमहांकाळ) गावचे सुपुत्र व विद्यमान उपसरपंच मा दतात्रय सुर्यवंशी यांना वाढदिवसा निमित्ताने मान्यवरांच्या कडून खूप मोठ्या शुभेच्छा देण्यात आल्या.              यामध्ये कवठेमहांकाळ तालुका मार्केट कमिटीचे सभापती महेशराव पवार,शेतकरी दुध संघाचे संचालक सुधाकर सुर्यवंशी,सरपंच अंजना कांबळे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानू कांबळे,ग्राम विकास सोसायटीचे चेअरमन अनिल सुर्यवंशी,व्हा चेअरमन गुलाब मुलाणी,ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष विकासराव माने-पाटील,ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील,शरद घुले,धोंडीराम चव्हाण,धनंजय पवार,प्रशांत बंडगर,कुमार तपटे,विनायक जाधव,ओंकार सुतार,बाळासाहेब सुतार,सचिन हंबेरेसह मान्यवरांचा प्रामुख्याने यामध्ये समावेश होता. 
       
तर गावातील मुख्य चौकात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानाचा फेटा बांधून,शाल श्रीफळ देऊन व केक कापून दतात्रय सुर्यवंशी यांचे आभिष्टचिंतन करण्यात आले.यावेळी फटाक्यांची आतिषबाजीसह एकच जल्लोष करण्यात आला.