NC Times

NC Times

पुणे येथील ससून रुग्णालयात उंदीर चावून एका रुग्णाचा मृत्यू


नवचैतन्य  टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-  ससून रुग्णालयाचा लापरवा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. एका रुग्णाला उंदीर चावून त्याचा मृत्यू झाला धक्कादायक आणि संतापजनक प्रकार झाला असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे. त्यासोबत ससून प्रशासनावर कारवाई करावी अशी मागणी त्या नातेवाईकांनी केली आहे. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असं पवित्रा घेतला आहे.
 सागर रेणुसे (वय २०किंवा २१ अंदाजे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. १६ मार्च रोजी सागर याचा अपघातात त्याच्या मानेला मोठी दुखापत झाली होती. दरम्यान तो ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता. त्याच्यावर क्रोमा सेंटरच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र आज उपचारदरम्यान उंदीराने चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाला, असा थेट आरोप सागर रेणुसेच्या नातेवाईकांनी केला आहे.
 सागरचे मृत्यूचे फोटो आपल्या हाती लागले आहेत. यामध्ये उंदराने कानाला कुर्तडले असल्याचे खूण स्पष्ट दिसत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. यावरून त्यांनी मोठा संताप व्यक्त करत ससून रुग्णालयाला घेराव घातला आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा ही नातेवाईकांनी घेतला आहे. याबाबत ससून रुग्णालयातील प्रशासनाकडून अद्याप कोणताही खुलासा देण्यात आलेला नाही.