NC Times

NC Times

होंडा नॅशनल स्किल काँटेस्ट मध्ये मिरज येथील ट्राय कलर होंडाच्या सर्व्हिस मॅनेजरची बाजी देशात द्वितीय क्रमांकाचे मानकरी


नवचैतन्य  टाईम्स सांगली (प्रतिनिधी) - होंडा टू व्हीलर्स इंडिया मार्फत घेतल्या जाणाऱ्या नॅशनल स्किल काँटेस्ट सन 2023-24 मध्ये मिरज शहरातील ट्राय कलर होंडा सर्व्हिस मॅनेजर सुहास पाटील यांनी देशात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
या आधी ट्राय कलर होंडाच्या सर्व्हिस टीमला गेले ४ वर्षे सतत अवॉर्ड मिळाला आहे, तिच परंपरा यावर्षीही ट्राय कलर होंडाचे सर्व्हिस मॅनेजर सुहास पाटील यांनी कायम राखली आहे.
सन २०२३-२४ च्या स्किल काँटेस्ट मध्ये देशातील ११३१ सर्व्हिस मॅनेजर यांनी  सहभाग घेतला होता.
सदर स्किल काँटेस्ट साठी होंडा टू व्हीलर्स इंडिया मार्फत ट्रेनिंग इन्चार्ज सचिन कुमार तसेच ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर सागर मोरे , किरण कुलकर्णी आणि विवेकानंद बंडगर,तसेच एरिया मॅनेजर रोहित गेन्ने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले,तसेच ट्राय कलर होंडा मिरज चे मॅनेजिंग डायरेक्टर अमित मगदूम तसेच मॅनेजर मुरग्याप्पा माळी,अनुप दानोले,सुशील कोल्हे,पल्लवी खोराटे व ट्राय कलर होंडा चे सर्व सहकारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.