NC Times

NC Times

घाटमाथ्यावर रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी



नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/ वार्ताहर(जालिंदर शिंदे)- कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील  घाटनांद्रे तिसंगी,वाघोली,गर्जेवाडी,     कुंडलापुर,जाखापुर व कुची परिसरात रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.युवकांच्या अगदी बरोबरीने युवतीही या रंगात चांगल्याच रंगुन गेल्या होत्या.    अगदी होळी सणाला लागुनच येणारा सण म्हणजे    रंगपंचमी.होळी नंतर येणारी पोर्णिमा ते पंचमी या दरम्याने हा सण साजरा केला जातो.एकमेकांच्या अंगावर विविध प्रकारचे रंग उडवून अगदी उत्साहात हा सण साजरा करीत होते. कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावर तर अगदी सकाळ पासूनच बाळगोपाळां मध्ये या सणाची लगबग दिसुन येत होती.पण दुपारी अकरा वाजल्यापासून नंतर मात्र युवक-युवतीच्याही झुंडीच्या झुंडी एकमेकांना रंग लावत फिरताना गल्लोगल्ली दिसत होत्या