NC Times

NC Times

आपल्या भारत देशाची कीर्तीच महान"...

नवचैतन्य टाईम्स वाई (अमोल मांढरे)भारतीय संस्कृतीचा आदर्श असलेल्या सबंध आपल्या भारत देशातील युवकांना माझा नमस्कार. आपला देश हा एक युवाशक्ती म्हणून ओळखला जातो. आजच्या वर्तमानातील युवकच उद्याच्या भविष्यातील देशाचे आधारस्तंभ आहेत.
मी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत असताना, आणि समाजातील घडणाऱ्या विविध घटनांचा आणि अनुभवांचा अभ्यास करून मी एक महत्त्वाचा लेख आपल्या समोर मांडत आहे. आज वाढत्या स्पर्धेत बरोबर नवनवीन तंत्रज्ञान निर्माण होत आहेत. पूर्वी काही अंतर पायी चालणारा मानव आज लोडाला टेकून मोबाईल वर गाणी ऐकण्यात दंग होत आहे. अश्मयुगातील माणूस बघितला तर आपणास दिसेल की, माकडाचे रूप असणारा माणूस पावलोपावली अडचणीत राहून टप्प्याटप्प्याने प्रगती करून डोळ्यासमोर उज्वल भवितव्याचा मागोवा घेत आजचा धडधाकट प्रखर बुद्धीचा माणूस निर्माण झाला. पूर्वीपासून असे ऐकले जाते की भारत भूमी ही एक सुवर्ण भूमी म्हणून ओळखली जाते. आपल्या देशातून सोन्याचा धूर निघायचा म्हणे.यामागचे रहस्य उलगडून बघितले तर असे स्पष्ट होते की, जी मानव जात कधीही संकटाला न डगमगता, कधीही न थांबता उज्ज्वल वाटचाल केली.वाटेवर अडचणींचे डोंगर उभे होते ,वाटेत काटे होते, पण न जुमानता त्यांनी आपली वाट अथक परिश्रम आणि सुखकर केली.
मागील काळ बघितला तर आपल्यासमोर एक चित्र उभे राहते की ते म्हणजे तेव्हा आपल्याकडे काय होते? आज चुलीच्या जागी गॅस आले. दळणवळण ,संपर्क यंत्रणा यांचे जाळे सर्वत्र पसरलेले आहे. पायी चालणारा माणूस आता सातासमुद्रापार काय तर दुसऱ्या ग्रहांवर वास्तव्य करण्याचे स्वप्न साकारत आहे. कारण म्हणजे न थांबता आपल्या परिश्रमाच्या जोरावर कष्टाने, बुद्धीने नवनवीन तंत्रज्ञान निर्माण केले. आता पृथ्वीवर क्वचितच एक जागा असेल की ज्याच्यावर मानवाचे पाऊल पडले नसेल. मानवाच्या या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकला तर लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे, मानवाने संघटित होऊन देशालाप्रगतीपथावर नेण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्वकष्टाने विश्रांतीची अपेक्षा न करता दगडालाही आपल्या कष्टाने सोने केले. आपल्यावर इंग्रजांनी राज्य केले होते.तेव्हा चा इतिहास बघितला तर आपणाला स्पष्ट होण्यास वेळ लागणार नाही.महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे थोर चरीत्र देशाला काय तर जगाचा डोळे दीपनारे आहे. आपल्या कर्तुत्वावर वयाची पर्वा न करता महाराष्ट्रातील निधड्या छातीच्या मावळ्यांना संघटित करून स्वराज्य निर्माण केले. आणि विशेष म्हणजे आपल्या गनिमी काव्याचा अभ्यास आज जगातील प्रगत राष्ट्र ही करत आहेत..
गांधीजींनी आपल्या अहिंसेच्या थोर मार्गाने आरामाला हराम मानून इंग्रजी सत्तेविरुद्ध चळवळ करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांनी न थांबता न डगमगता देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. लोक जागृती साठी गणेशोत्सव आणि शिवजयंती यांसारखे सार्वजनिक सण साजरा करण्याची प्रथा रूढ केली. व ती आजच्या काळात युवक शक्तीला संघटित करत आहेत.आणि आपल्या देशासाठी बलिदान करणाऱ्या महापुरुषांचा आदर्श युवकांच्या मनात आदर्श म्हणून निर्माण आहेत. भगत सिंग यांनी स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करुन आणि स्वतःच्या बलिदानाने देशाला आणि समाजाला वेगळा मार्ग दाखविला. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अथक परिश्रमाने आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जगाच्या पाठीवरील थोर लोकशाही राष्ट्र असलेल्या आपल्या भारतीय राज्य घटनेची स्थापना केली. आणि तीच राज्यघटना आज आपल्या भारत देशाची मान सर्व जगासमोर ताठ मानेने उभी आहे. इतिहासातून युवक वर्गाने नेहमी शिकत राहावे ही आपल्या थोरांची शिकवण आहे. आपल्या देशाला अनेक थोर महापुरुषांची पार्श्वभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, लोकमान्य टिळक ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, झाशीची राणी ,माता जिजाबाई, आणि भगतसिंग, राजगुरू महान व्यक्तींचा आदर्श घेऊन युवक वर्गाने भविष्यात आपली उज्ज्वल भवितव्य घडवावे, व स्वतःच्या कुटुंबाबरोबर देशहितासाठी कार्यरत राहावे. सध्याच्या कोरो ना संकट काळात युवक वर्गाने स्वतः पुढे येऊन उत्तम समाज कार्य केलेले आहे. याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमानच आहे. परंतु युवक वर्गाने यापुढेही नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे न राहता समाजातील विविध प्रश्नांचा अभ्यास करून त्यावर उत्तर शोधावे. आपली जगाला हेवा वाटणारी भारतीय संस्कृती ,आयुर्वेद, योगाभ्यास, आपली सैन्य नीती ही जगासमोर एक आदर्श आहे. तेव्हा युवकांनी ही पाश्चात्य संस्कृतीला बळी न पडता आपली भारतीय संस्कृतीचा स्वीकार करून जगासमोर असलेले आपले आदर्श स्वराज्य भविष्यातही तसेच राहील याची दक्षता घ्यावी. मेक इन इंडिया, जागतिक योग दिवस, त्याचबरोबर आयुर्वेद या विविध क्षेत्रात आपला भारत देश जगाला एक विश्वगुरू या नात्याने अनेक प्रश्नांवर आपले विचार मांडत आहे. दहशतवादाचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तान आणि आपल्या शत्रू राष्ट्र चीनबरोबर परराष्ट्र धोरण अभ्यासपूर्वक राबवून जागतिक राजकारणात भारताला एका नव्या उंचीवर ठेवण्याची दक्षता युवक वर्गाने घ्यावी. त्याचबरोबर पारंपारिक करिअरची क्षेत्रे झुगारून आधुनिक व नाविन्यपूर्ण क्षेत्रांचे अवलोकन करून युवक वर्गाने आणि विशेषता विद्यार्थ्यांनी आपले उज्ज्वल भवितव्य घडवावे .त्याचबरोबर समाजातील विविध प्रश्नांना सामोरे जाताना पक्षीय व वैचारिक मतभेद झुगारून राष्ट्रहित हे एकमात्र उद्दिष्ट युवक वर्गाने डोळ्यासमोर ठेवावे. देशांतर्गत पोलिस यंत्रणा व सीमेवर वीर जवान आपल्या प्राणाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडत आहेत. तेव्हा आपल्या युवक वर्गाने देखील त्यांच्याबद्दल अभिमान बाळगून आपले कर्तव्य पार पाडावे.आज युवक वर्गाला पत्रकारिता हे क्षेत्र एक आव्हान म्हणून खुणावत आहे. तेव्हा आजच्या युवकांनी सध्याच्या असलेल्या सोशल मीडिया व व आधुनिक संपर्क यंत्रणेचा फायदा घेऊन आपल्या लेखणीने समाजप्रबोधनाचे कार्य निपक्ष आणि निस्वार्थपणे चालू ठेवावे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याला असलेल्या आदर्श पत्रकारितेचा वारसा भविष्यातही कायम ठेवावा .तेव्हा आपल्यामहाराष्ट्र राज्याला असलेल्या आदर्श प्रबोधनाचा वारसा आपले वृत्तपत्र हे भविष्यातही कायम ठेवेल. यात तिळमात्र शंका नाही...यावरूनच आजची युवा पिढी थांबला तो संपला हे बोधवाक्य आपल्या रक्तातच भरून समाजाच्या विकासासाठी झगडले पाहिजे. तेव्हा आपला भारत देश हा जगाच्या पाठीवरील एक महासत्ता म्हणून नक्कीच उदयास येईल हीच आई भवानी चरणी प्रार्थना. जय महाराष्ट्र
कविराज अमोल मांढरे. वाई. जिल्हा सातारा.
Mobile no.7709246740.