NC Times

NC Times

घाटमाथ्यावर तुकाराम बीज मोठ्या उत्साहात संपन्न


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)                              कवठेमहांकाळ तालुक्याच्या             घाटमाथ्यावर          घाटनांद्रे,तिसंगी,वाघोली,गर्जेवाडी,कुंडलापुर,जाखापुर व कुची परीसरात तुकाराम बीज ही विविध धार्मिक कार्यक्रमासह मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथेही सालाबादप्रमाणे याही वर्षी मच्छिंद्र (बाळा) शिंदे यांच्या घरी व विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही तुकाराम बीज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.याठीकाणी अगदी सकाळ पासूनच तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे भजनासह किर्तन चालू होते.तर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रतिमा पुजन,पुष्पवृष्टी करून आरती करण्यात आली.तर कार्यक्रमाची सांगताही महाप्रसाद वाटपाने झाली.याचा लाभ तमाम भाविक भक्तांनी घेतला.