NC Times

NC Times

मगरीला जेवण भरवणं पडलं महागात, भुकेल्या प्राण्यानं केला हल्ला, शेवटी काय घडलं ते नवलच


नवचैतन्य टाईम्स कराड प्रतिनिधी(संतोष पाटील)  
मगर हा अत्यंत खतरनाक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे तिच्या आसपास सुद्धा फिरकू नका असा सल्ला अनेकदा प्राणी तज्ज्ञ देताना दिसतात. अन् त्यामध्ये जर का ती मगर भूकेली असेल तर मग काय विचारायलाच नको. ती कधी हल्ला करेल सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. प्राणी संग्रहालयातील एक कर्मचारी भुकेल्या मगरीला जेवण देत होती. पण या मगरीनं हातामधील मांसाच्या तुकड्या ऐवजी तरुणीचा हातच खेचला. मगरीनं आपल्या जबड्यात तिचा हात पकडून ठेवला होता. शेवटी त्या तरुणीचा हात कसा बाहेर काढला हे आता तुम्हीच पाहा. या पुढे ती उभ्या अयुष्यात कुठल्याही मांसाहारी प्राण्याला जेवण द्यायला जाईल असं वाटत नाही. खरंच या मगरीचा थरारक हल्ला पाहून तुम्ही देखील चकित व्हाल. 
ZOO मध्ये नेमकं घडलं तरी काय?
ही घटना अमेरिकेतील ‘स्केल्स अँड टेल्स रेप्टाइल्स सेंटर’मध्ये घडली आहे. तर त्यातं झालं असं की, एक लहान मुलगा आपल्या कुटुंबीयांसोबत आपला बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी प्राणी संग्रहालयात आला होता. दरम्यान लिंडसे बुल नावाची तरुणी मगरीला दुपारचं जेवण देण्यासाठी तिच्या पिंजऱ्यात गेली होती. तिनं या मगरीला एक मांसाचा तुकडा टाकला आणि ती बाहेर येत होती. तेवढ्यात मगरीनं तिच्या हातावर हल्ला केला. हा हल्ला इतक्या वेगानं झाला की तिला सावरण्याची संधी देखील मिळाली नाही. या मगरीनं तिचा हात आपल्या जबड्यात घट्ट आवळून धरला होता. अन् आता ती गोल फिरून हात तोडण्याच्या तयारीत होती. पण तरुणी देखील थोडी अनुभवी ती लगेचच प्रसंगावधान दाखवत मगरीच्या पाठीवर चढली आणि हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागली.
शेवटी हात कसा काढला बाहेर? 
तिला वाचवण्यासाठी ZOO मधील आणखी एका कर्मचाऱ्यानं पिंजऱ्यात उडी मारली आणि तो मगरीचा जबडा उघडण्याचा प्रयत्न करू लागला. पण ही मगर तब्बल ७ ते ८ फूट मोठी होती. त्यामुळे तिला आवरणं सोपं नव्हतं. अखेर दोघांनी मिळून पूर्ण ताकतीनिशी जबडा उघडला आणि हात बाहेर काढला. पण तो पर्यंत तिच्या हाताला खूप जखमा झाल्या होत्या. हा व्हिडीओ ३८ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून जवळपास सर्वांनीच या आश्चर्य व्यक्त केलं आहे. कारण पाळीव मगरी सहसा असा हल्ला करत नाही. पण ही मगर बहुदा नुकतीच जंगलातून पकडली असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.