NC Times

NC Times

बिबट्यानं केली हरणाची शिकार, तेवढ्यात तरस आणि मगरीनं केला हल्ला


जंगलात जिंवत राहणं सोपं काम नाही. सिंह असो वा ससा जिवंत राहण्यासाठी दररोज पळावं लागतंच. हा आता काही जण शिकार करण्यासाठी पळतात तर
काही जण शिकार होऊ नये म्हणून पळतात. जंगलात सुरू असलेल्या अशाच एक संघर्षाचा व्हिडीओ समोर आला आहे. तर त्याचं झालं असं की, एका हरणावर बिबट्यानं हल्ला केला. हे हरीण त्या बिबट्याच्या तावडीतून सुटण्यासाठी जोवतोड मेहनत करत होतं. तेवढ्यात एका तरसानं त्याच्यावर दुसरा हल्ला केला. आता बिबट्या आणि तरस यांच्यात त्या हरणासाठी संघर्ष सुरू झाला. पण हे सगळं कमी होतं म्हणून की काय या लढाईत मगरींनी देखील उडी मारली. शेवटी या हरणाची शिकार कोणी केली हे आता तुम्हीच पाहा. या हरणाची अवस्था पाहून खरंच तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी.
लढाईत शेवटी काय घडलं?
ही लढाई दक्षिण आफ्रिकेली क्रूगर नॅशनल पार्कमध्ये घडली आहे. एका बिबट्यानं मोठ्या कष्टानं हरणाला पकडलं होतं. पण तेवढ्यात तिथे एक तरसांची टोळी आली अन् त्यांनी ही शिकार हिसकावून घेतली. पण लक्षवेधी बाब म्हणजे तरसाला देखील हरीण मिळालं नाही. कारण या लढाईन एका मगरीची एण्ट्री झाली. आधीच तरस बिबट्यासोबत लढाई करून दमला होता. त्यामुळे मगरीसमोर त्यानं जणू हातच टेकले. मगरीनं एक-दोन हल्ल्यांमध्येच ते मृत हरीण हिसकावून घेतलं आणि शेवटी ही लढाई जिंकली. या हरणाला मिळवण्यासाठी तीन प्राणी एकाच वेळी लढत होते.
Sightings या युट्यूब अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अन् या लढाईचा शेवट पाहून खरंच तुम्ही देखील अवाक् व्हाल. व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी या हरणाबाबत दु:ख व्यक्त केलं आहे.