NC Times

NC Times

घाटमाथ्यावर होळी पारंपरिक पद्धतीनेच मोठ्या उत्साहात संपन्न


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) मराठी वर्षातील शेवटच्या महिन्यातील पोर्णिमेला येणारा सण म्हणजे 'होळी'.हा सण कवठेमहांकाळ शहरासह ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने पण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
दृष्ट प्रवृत्ती,वाईट व अमंगल विचाराचा नाश करुन चांगली वृत्ती व चांगले विचार अंगी बाळगणे हा या सण साजरा करण्या मागील खरा उद्देश.बाळगोपाळांची तर या सणा विषयीक दोनतीन दिवसा पासूनच लगबग सुरू झाली होती. 
गवऱ्या  (शिणकुटे) सह होळीसाठी लागणारे साहित्य गोळा करण्यात बालगोपाळ चांगलेच रमुण गेली होते.पण पुर्वी घरोघरी पेटविण्यात येणारी या होळीचे स्वरुपच बदलून जाऊन सध्या सार्वजनिक ठिकाणीच होळी साजरी होतानाचे चित्र बर्याच ठिकाणी दिसत होते.याच ठिकाणी येऊन लोक होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पुजा करत होते.