NC Times

NC Times

पैशासाठी वारंवार शारिरीक आणि मानसिक छळाला कंटाळून विवाहितेचे गळफास घेऊन आत्महत्या तिघांवर गुन्हा दाखल


नवचैतन्य टाईम्स  पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे) विवाहित महिलेला सासरवास हा काही नवीन नसतो. घरातल्या कामाचा तसेच मुलांचा पतीचा आणि सासू सासऱ्यांचा त्रास हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात पहायला मिळतो. परंतु आज महिला दिनानिमित्त पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भगवतीनगर पाषाण येथील सदनिकेत ही घटना घडली होती. याबाबत चतुःश्रृंगी पोलिसांनी कारवाई करत पती, सासू-सासर्‍यासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
 मिळालेल्या माहितीनुसार, रसिका अतुल वाघ (२४) असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी, चतुःश्रृंगी पोलिसांनी पती अतुल पुरूषोत्तम वाघ (३३), सासरे पुरुषोत्म वाघ, सासू शांताबाई वाघ या तिघांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रसिकाचे वडील मोहन जानरावजी राऊत (५५) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ जुलै २०२२ ते ७ डिसेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी रसिका विवाह झाल्यापासून मुलांसह सासरी नांदत असताना आरोपी तिच्याकडे माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी तगादा लावत होते. तिला टोचून बोलत तिचा शारिरीक आणि मानसिक छळ करत होते. त्यातूनच रसिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक शामल पाटील करीत आहेत.