NC Times

NC Times

घाटनांद्रेत महिला दिनानिमित्य नारीशक्तीचा सन्मान


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) 
 घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने माझी वसुंधरा अभियान चार या योजनेंतर्गत राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधुन गावातील शुन्य कचरा व्यवस्थापनाचा यशस्वीपणे अवलंब करणार्या एकुण चौदा कुटुंबांचा घरगुती वापरासाठीचे लाकडी कपाट भेट देऊन तर उपस्थित महिलांचाही विविध वस्तू भेट देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी ग्रामस्थासह महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. 
यावेळी उपस्थितांना सरपंच अमर शिंदे,उपसरपंच सुनील कांबळे,सोसायटीचे चेअरमन प्रल्हाद शिंदे,सेवानिवृत्त प्राध्यापक लालासाहेब शिंदे,पोलीस पाटील एकनाथ शिंदे,शिक्षिका श्रीम सुनिता शिंदे,ग्रामसेवक झैलसिंग पावरा यानी मार्गदर्शन केले.यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य,गावातील विविध पदाधिकारी,महिलावर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक सरपंच अमर शिंदे यांनी तर आभार ग्रामसेवक झैलसिंग पावरा यांनी मानले.