NC Times

NC Times

आटपाडी तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेल अध्यक्ष समाधान पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला...


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख) आटपाडी तालुक्यातील झरे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल (अजित पवार गट )आटपाडी तालुकाध्यक्ष श्री समाधान किसन पाटील यांच्या वर दि.४ रोजी बिरणवाडी वायफळे नजिक प्राणघातक हल्ला करण्यात आला.
यामध्ये डोक्यास व हाता पायाला जबर मुका मार लागला आहे या अनुषंगाने तासगाव पोलिस ठाण्याअंतर्गत अज्ञात वाहन चालकावर भारतीय दंड विधान संहिता 1860 अधिनियमान्वये कलम 279,337,338 मोटार व वाहन अधिनियमान्वये 1988 कलम 184,134 (A),134 (B) 177 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे 
याबाबत अधिक माहिती अशी की ते मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली,व जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे झरे येथील मायाक्कादेवी मंदीर या ठिकाणी लोकवर्गणीतून पेव्हिंग ब्लाॅक बसविलेले असताना,‌देखील ग्रामपंचायत प्रशासनाची फसवणूक करून रोजगार हमी योजनेअंतर्गत सदर कामाचे टेंडर काढत असल्याची तक्रार देण्यासाठी, तसेच जुन्या मजूर संस्था बंद व्हाव्यात,किंवा नवीन मजुर संस्था नोंदणीला परवानगी द्यावी अश्या आशयाची दोन निवेदने देण्यासाठी गेले होते.

दुपारी 3 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली यांच्या दालनात सु.बे अभियंता यांची बैठक पार पडली या बैठकीदरम्यान नवनाथ पाटील यांचा समाधान पाटील यांना फोन आला व यामध्ये तु तक्रार  देऊ नकोस असे म्हणाले असता, समाधान पाटील म्हणाले तुझे नाव नाही तुझा या कामात काही विषय नाही यावर नवनाथ पाटील यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, व तु गावात येऊन दाखव असे जीवे मारण्याची धमकी दिली होती.
यानुसार समाधान पाटील यांनी असे मत व्यक्त केले की दुपारी झालेल्या वादातून मला मारण्याच्या उद्देशाने नवनाथ पाटील यांनी अज्ञात व्यक्ती करवी माझ्या गाडीस धडक देऊन मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे, माझ्या जिवितास धोका असुन मी तासगाव पोलिस ठाण्याअंतर्गत फिर्याद दिली आहे परंतु अद्याप दोषींना अटक करण्यात आली नाही
मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली यांच्या दालनात सुबे अभियंता यांची बैठक झाली या बैठकीदरम्यान नवनाथ पाटील व माझ्यात वाद झाला, याचाच राग मनामध्ये धरून  राजकीय षढयंत्रापोटी माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला यामध्ये मी सुदैवाने बचावलो परंतु माझ्या जिवितास धोका संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे परंतु अद्याप कारवाई करण्यात आली नाही.