NC Times

NC Times

पहिलीतील मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला अटक

 
नवचैतन्य टाईम्स सांगली(प्रतिनिधी) -शिक्षण घेणार्‍या मुलीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करणार्‍या एका खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकाला मंगळवारी अटक करण्यात आली. संस्थेनेही या शिक्षकावर बडतर्फीची कारवाई केली असून अशा समाज विघातक प्रकारांना संस्था कदापि पाठीशी घालणार नसल्याचा निर्वाळा संस्थेच्यावतीने देण्यात आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी विश्रामबागमध्ये असलेल्या महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या खासगी शाळेमध्ये पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणार्‍या पिडीतेशी शिक्षक संदीप पवार याने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पीडितेने पालकांना सांगताच पालकांनी याबाबत संस्थेचे सचिव सुरेंद्र चौगुले यांच्याकडे तक्रार केली. संस्थेनेही त्यांना तात्काळ बडतर्फ केले.