NC Times

NC Times

कुमठे फाट्यावर विहीर खुदाई मजुराचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू


नवचैतन्य टाईम्स कराड प्रतिनिधी(संतोष पाटील) 
 कोरेगाव तालुक्यातील भोसे येथून अमावास्येसाठी नारळ आणि फुले आणण्यासाठी मोटारसायकलवरून कोरेगाव येथे आलेल्या दोघा विहीर खुदाई कामगारांना भोसे येथे परत जात असताना कुमठे फाट्यावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोघेही कामगार जागीच ठार झाले. आनंद आप्पालाल चव्हाण (वय ३७) यांनी याबाबत कोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 याबाबत पोलिसांनी सांगितले की, विहीर खुदाईचे काम करण्याच्या निमित्ताने आप्पालाल देशू चव्हाण (वय ५५, मूळ रा. कुडगी, ता. कोलार, जि. विजयपुर, राज्य कर्नाटक) हे आपल्या कुटुंबासह भोसे येथे रहात होते. त्यांच्यासह कामानिमित्ताने त्यांच्याच गावातील महादेव गौड (वय ७७) हेही रहात होते. शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आप्पालाल हे आपल्या मोटारसायकलवरून (क्रमांक केए २८- एबी १३५०) महादेव यांना बरोबर घेऊन रविवारी (ता. दहा) अमावस्या असल्यामुळे नारळ आणि फुले आणण्यासाठी कोरेगावमध्ये आले होते.