NC Times

NC Times

गळवेवाडी येथील वयोवृद्ध महिलेच्या मालमत्तेवर ग्रामसेवक सरपंचाचा डल्ला पीडित महिलेचा आत्मदहनाचा इशारा


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख) 
गळवेवाडी गावातील कै. सदाशिव गळवे यांच्या नावावरील ग्रामपंचायत हद्दीतील मिळकत साधारणपणे एक गुंठा जमीन ग्रामसेवक व सरपंच यांनी परस्पर बक्षीस पत्र दस्त करून फसवणूक केली असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे याबाबतची लेखी तक्रार चंद्रभागा सदाशिव गळवे यांनी केली आहे यांच्या तक्रारी वरती अद्याप कारवाई न झाल्याने आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे
गळवेवाडी ग्रामपंचायत मिळकत क्रमांक १०० यामध्ये दोन खण माळवद व छप्पर अशी नोंद असलेली जागा गळवेवाडी गावचे सरपंच व ग्रामसेवक यांनी कैलासवासी सदाशिव गळवे यांच्या वारसाची कोणतीही परवानगी न घेता परस्पर राजेंद्र गळवे व आबासो गळवे यांच्या नावे करून सदर मिळकत क्रमांक ७३३ अशी ग्रामपंचायत दप्तरी नोंद धरून परस्पर जिल्हा परिषद co  यांच्या नावे बक्षीस पत्र करून त्या जागेवरती जिल्हा परिषद शाळेची इमारत उभारण्याचं काम सुरू केला आहे या फसवणुकीबद्दल चंद्रभागा गळवे यांनी एक मार्च रोजी लेखी पत्राद्वारे आटपाडी तहसीलदार त्याचबरोबर गटविकास अधिकारी सरपंच ग्रामसेवक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद व पोलीस निरीक्षक आटपाडी यांच्याकडे तक्रार दिली आहे


यातील कोणत्याही विभागाने या तक्रारी वरती अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे चंद्रभागा गळवे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे
चंद्रभागा गळवे ह्या वयोवृद्ध आहेत त्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नाही शिवाय त्यांना बीपी शुगर या व्याधींचा त्रास आहे  त्या गावापासून दूर एकट्याच राहतात मागील दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री त्यांच्या घरी जाऊन तीन इसमांनी जबरदस्तीने त्यांच्या हाताच्या अंगठ्याचे ठसे कोऱ्या कागदावरती उठवून घेतले आहेत याबाबत ही चंद्रभागा गळवे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार अर्ज दिला आहे.
वयोवृद्ध महिला तिची झालेली फसवणूक याबाबत न्याय मिळण्यासाठी संघर्ष करत आहे परंतु यंत्रणेतील कोणताही विभाग त्यांना  न्याय देण्यासाठी तसदी घेण्यास तयार नाही जबाबदार अधिकाऱ्यांच्या अशा वागण्याने सर्वसामान्य नागरिकांचा प्रशासकीय यंत्रणेवरील विश्वास कमी होत चालला आहे यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी गोरगरिबांच्या अशा समस्या गांभीर्याने सोडवण्याची आवश्यकता आहे जनतेच्या भावनांचा उद्रेक झाला तर अशा पक्षपाती अधिकाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.