NC Times

NC Times

तुमच्यात चित्रपट पाहण्याची हिंमत आहे? 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटावर सुप्रिया पिळगावकरांचा रोखठोक प्रश्न


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(नेहाल हसन) 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अवघ्या तीन दिवसात या चित्रपटाने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं आहे. अनेकजण चित्रपटाचं कौतुक करत आहेत. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. त्याने चक्क या चित्रपटासाठी स्वतःचं घर, गाडी, शेती सगळं गहाण ठेवलं आहे. यापूर्वी महेश मांजरेकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचं समोर आलं होतं. मात्र त्यांनी माघार घेतल्यानंतर रणदीपने स्वतः या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशातच मराठमोळ्या अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी एक पोस्ट करत चित्रपटाचं कौतुक केलं आहे. सोबतच हा चित्रपट तुम्ही पाहू शकाल का असा प्रश्नही त्यांनी विचारलं आहे.
 सुप्रिया यांनी या चित्रपटाचं कौतुक करत त्यांच्या बालपणीची आठवण सांगितली आहे. त्यांनी एका दिवसापूर्वी 'स्वातंत्रवीर सावरकर' हा चित्रपट पहिला. त्यानंतर पोस्ट करत त्या म्हणाल्या, 'मी १२ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी मला माझ्या शाळेच्या सुट्टीत वाचण्यासाठी एक पुस्तकआणून दिलं. ते एक जाडजूड पुस्तक होतं. सुट्टीच्या शेवटी ते वाचून पूर्ण करणं अपेक्षित होतं. मी वाचायला सुरुवात केली आणि मी वाचन पूर्ण होईपर्यंत ते खाली ठेवूच शकले नाही. वाचनात सुरुवातीला खूप वेळा थांबावं लागलं कारण मी रडत होते, नुसती रडत होते, पुस्तकात अर्ध्या वाचनानेच मी सुन्न झाले होते. ते पुस्तक पुन्हा काल जिवंत झालं. त्या पुस्तकाचं नाव होतं माझी जन्मठेप ! आणि चित्रपट वीर सावरकर हा. हा चित्रपट बघण्याची हिम्मत तुम्ही दाखवू शकाल का?'  सुप्रिया यांनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे. सोबतच तुमच्यात हा चित्रपट पाहण्याची हिम्मत आहे का असा रोखठोक प्रश्नही विचारला आहे. तर नेटकऱ्यांनीही या पोस्टवर त्यांना पाठिंबा दिला आहे. पुस्तक आणि चित्रपट दोन्ही अप्रतिम असल्याचं नेटकरी सांगत आहेत