NC Times

NC Times

"आज महिला दिनानिमित्त विशेष लेख"....


नवचैतन्य टाईम्स वाई (अमोल मांढरे) 
प्रथम येथे उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनींना  सप्रेम नमस्कार. आज आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आज उपस्थित स्त्रियांपुढे आज महिला दिनानिमित्त  मी काही विचार मांडत आहे.
 खरंच आज महिला दिना दिवशी प्रत्येक स्त्रीच्या मनात एक विचार येतो खरोखरच आपण पूर्ण स्वतंत्र झालो आहोत का.? आपल्याला पूर्ण विकासाची संधी मिळते का. ?आजच्या वाढत्या जागतिकीकरणात पुरुषांबरोबर स्त्रियांचाही सर्व क्षेत्रांमध्ये सहभाग अग्रेसर असाच आहे. ही खरोखरच आपल्यासाठी एक आणि समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज शहरी भागात विविध क्षेत्रातील उच्च पदांवर स्त्री वर्गाचे अस्तित्व खरोखरच समाजासाठी एक सकारात्मक गोष्ट आहे परंतु आपण पूर्वीचे काळ बघितला तर तेव्हा फक्त स्त्री म्हणजे चूल आणि मूल या दोन भागातच बंदिस्त अशीच होती. तेव्हा स्त्री वर्गाच्या उत्कर्षासाठी कोणीही पुढे येत नव्हते. तेव्हा मात्र आपले युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः  लक्ष घालून आपल्या मातोश्री जिजाबाई यांच्या संस्काराने आणि योग्य शिकवणे नुसार स्त्री वर्गाच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले. स्त्रियांना बंदिस्त न ठेवता त्यांनाही मनमोकळेपणाने वागणे,आणि समाजाच्या प्रवाहाबरोबर चालण्याचा हक्क देणे, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतीची प्रथा त्यांनी बंद केली. त्यानंतरच्या काळात सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी समाजाचा विरोध पत्करून ही आपले काम स्त्रियांच्या विकासासाठी चालूच ठेवले. तेव्हा जर सावित्रीबाईंनी समाजाच्या विरोधाला घाबरून कार्य केले नसते तर आजच्या स्त्री वर्ग तुम्हाला बंदिस्त अवस्थेतच दिसला असता. परंतु त्यांच्यामुळेच आज स्त्रीशक्ती सर्वांगीण विकास होऊन विविध क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग अग्रेसर असाच आहे. आणि विशेष म्हणजे आज शहरीकरणाबरोबरच ग्रामीण भागातील स्त्रिया ही शासनाच्या विविध योजनांना उत्तम प्रतिसाद देऊन स्वतः बरोबरच कुटुंबाचेही पालन पोषण करीत आहे. तेव्ह. ज्या महापुरुषांनी आपल्या उत्कर्षासाठी आणि विकासासाठी अथक प्रयत्न केले त्या महापुरुषांचा आदर्श कायमच मनात ठेवून न घाबरता न डगमगता शासनाचे विविध योजनांचा सहकार्य करून स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाचा ही परिपूर्ण विकास करावा. आजची स्त्री विविध रूपात सर्व क्षेत्रात अग्रेसर दिसून येत आहे. कोणी आई म्हणून आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या उत्तम करिअर साठी स्वतः झटत आहे.तर कोणी पत्नी म्हणून संसारात  हातभार लावण्यासाठी विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत. आज सांस्कृतिक, आरोग्य, कला, क्रीडा, संस्कृती, राजकीय अशा विविध क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग हा उत्तमरीत्या पुढे आलेला दिसत आहे.तेव्हा स्त्रियांनीही आपल्या भारतीय संस्कृतीचा आदर्श आणि पावित्र्य कायम मनात ठेवून स्वतःचा विकासासाठी न डगमगता कुठल्याही अन्यायाला बळी न पडता स्वतःच्या कुटुंबाबरोबर समाजाच्या परिपूर्ण विकासासाठी सहकार्य करावे.. आज आपल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमधून स्त्रियांच्या परिपूर्ण विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. बचत गटामार्फत आपल्या बँकेतर्फे स्त्रियांना भरघोस आर्थिक मदत केली जाते. त्याचबरोबर आपल्या सातारा जिल्हा बँकेत आज विविध वरिष्ठ पदावर स्त्रियांचाही सहभाग अग्रेसर असाच दिसून येतो. ही खरोखरच समाजासाठी आणि आपल्या सर्वांसाठी एक सकारात्मक गोष्ट आहे.
 धन्यवाद.जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र..
लेखक.. कविराज अमोल मांढरे वाई.
वाई शहर शाखा.
Mobile no.7709246740.