NC Times

NC Times

वाईच्या ज्ञानदीप विद्यालयामध्ये पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न


नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी      (प्रा.सौ.सरस्वती  वाशिवले) 
दिनांक २३ मार्च २०२४रोजी ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूल वाई येथे लेखक प्रा. संभाजी लावंड यांच्या 'गुराखी' या ग्रामीण कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात व उत्साही वातावरणात पार पडला. या प्रकाशन समारंभास अनेक रसिक श्रोत्यांची व खातगुण गावातील व नातेवाईक यांची उपस्थिती विशेष लक्षणिय होती. ज्ञानदीप मधील आंग्ल विद्येचा अभ्यास करणारा सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता. कार्य क्रमाचे अध्यक्ष स्थानी मा. प्रा. डॉ. पंडित टापरे (माजी मराठी विभाग प्रमुख किसनवीर महाविद्यालय वाई) उपस्थित होते. कार्यक्रमाचे पाहुणे मा. प्रा डॉ. रघुनाथ केंगार (साहित्यिक व जेष्ठ समीक्षक) लाभले होते. खातगुण येथील कवी व साहित्यिक श्री अरविंद यादव यांनी उपस्थित राहून गावच्या स्मृतींना चांग लाच उजाळा दिला.तर डॉ स्वप्नील तौर यांनी उपस्थित राहून कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पोपटराव काटकर सरांनी व सौ. निशा बाबर मिस यांनी अभूतपुर्व केले. सुरुवातीला मान्य वरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
मान्यवरांचे सत्कार सोहळा झाल्यानंतर, संस्थेच्या वतीने श्री लावंड परिवाराचे शाल श्री फल देवुन उचित सन्मान करण्यात आला. 'गुराखी' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. पोपटराव काटकर सरांच्या प्रभावी सुत्रसंचालनाने रसिकांच्या मनात उत्साह निर्माण केला. प्राचार्या, शुभांगी पवार यांनी आपल्या भाषणा मधून वाचन चिंतनाने व्यक्तीला लेखन कला प्राप्त होते व या लेखनास पुरक असे वातावरण , निसर्गाचे वरदान ज्ञानदीप विद्यालयाला लाभले आहे. या सुंदर प्रेरणादायी वातावरणाचा फायदा लेखक म्हणुन आजसुद्धा सर्वांनी घेतला पाहिजे. मा. प्रा. डॉ.रघुनाथ केंगार सरांनी 'गुराखी' या पुस्तकाचे अंतर्बाह्य परीक्षण करुन लेखक व त्यांची चिंतनशीलता किती प्रभावी असू शकते याचा प्रत्यय म्हणजे 'गुराखी' कथासंग्रह आहे. असे गौरवोद्गार काढले. तर डॉ.पंडित टापरे सरांनी आपल्या भाषणातून 'गुराखी 'या पुस्तकातील बलस्थाने व भाषा शैलीचा मागोवा घेतला.   
विद्यावर्धिनी  संस्थेचे निर्माते मा. प्रा. डॉ.वाघचवरे,श्री चव्हाण साहेब,श्री जगदाळे साहेब आणि जेष्ट पत्रकार श्री मर्ढेकर साहेब आवर्जून उपस्थित होते, या प्रसंगी श्री  लावंड सरांची सुनबाई सौ. ऐकता लांवड यांनी छोटे खानी भाषण करुन माझे मामा यांच्या स्वभावातील तर्हेवाईक पैलुवर भाष्य करताच उपस्थितांमध्ये हास्याची लहर उसळली. शाळेतील विद्यमान महीला शिक्षिका सौ. लता जाधव यांनी एक कविता सादर करुन कार्यक्रमाची उंची वाढवली तर प्रा.सौ. सरस्वती वाशिवले यांनी  आपल्या भाषणामधून लेखकांची प्रगल्भता, आणि भावी लेखनास आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात बोर्ड वरील प्रकाशन सोहळ्याची सुंदर अक्षरांची माहिती कलाशिक्षक श्री संजय डेरे सरांनी लिहिली होती. वाचकांना ते लेखन खूप भावले. बैठक व्यवस्था श्री महांगडे काका व त्याच्या टीमने खूप चांगले केले होते. प्रा. पोपटराव काटकर सरांनी आभार मानले, लेखक प्रा.श्री संभाजी लांवड  यांनी उपस्थित सर्व रसिक श्रोत्यांना  भोजनाची मेजवाणी दिली वाईतील सुप्रसिद्ध 'मिलन'या भोजनालयातील सर्वांनी भोजन व्यवस्था उत्तम रीतीने पार पाडली असा ह्या यथेच्छ भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.