NC Times

NC Times

आरोग्यावर बोलू काही


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)                                                              महिलांनी स्वयंपाकघरात स्लिपर का घालावी ? डॉक्टर सांगतात बहुसंख्य बायकांच 'हे ' दुखण थांबेल...         जर महिलांनी स्वयंपाक घरातही काम करताना चप्पल वापरली तर 'हा' त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.  घरात चपला किंवा स्लिपर्स घालणं ही काही नुसती फँसन नाही.तर ती गरज बनली आहे.अजूनही घरामध्ये स्लिपर्स किंवा चपला घालणं जुन्या लोकांना   पटत नाही.पण हाडांशी संबंधित काही त्रास टाळायचे असतील तर मात्र महिलांनी घरात स्लिपर्स घातल्याच पाहिजे, असं डॉक्टर सांगतात.बऱ्याच जणींना अशीही सवय असते की एरवी घरभर फिरताना स्लिपर्स वापरतात.पण स्वयंपाकघरात मात्र देव्हारा असल्याने चपला घालणं टाळतात.तिथेच नेमकी चूक होते,असं तज्ञ सांगतात. बहुतांश महिलांचा सकाळचा आणि संध्याकाळचा असा कमीतकमी प्रत्येकी दोन - दोन तासांचा वेळ स्वयंपाक घरात जातोच.स्वयंपाक घरातली बहुतांश कामे त्या उभ्यानेच करत असतात.यामुळे टाचेवर खूप दाब येतो.याचा परिणाम म्हणजे साधारण चाळीशी नंतर बहुतांश महिलांना टाचेचं दुखणं मागे लागत.     

 त्यामुळेच जर महिलांनी स्वयंपाक घरातही कामं करताना चप्पल वापरली तर हा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.यासाठी ज्या चपलेचा सोल थोडा जाडसर असेल अशी चप्पल वापरावी.जर स्वयंपाक घरात स्लिपर्स घालणं तुम्हाला अजिबात पटत नसेल तर ओट्याच्या खाली फरशीवर एखादे जाडसर पायपुसणे अंथरुण ठेवा आणि त्या पाय पुसण्यांवर उभे राहूनच काम करा.जर पायपुसणं पातळ असेल तर एकावर एक दोन तीन असे पायपुसणं टाका आणि त्यावर उभ राहून काम करा,यामुळेही टाचदुखीचा त्रास टाळला जाऊ शकतो,अस डॉक्टर सांगतात.