NC Times

NC Times

एक वेगळा विषय. सैन्य प्रशिक्षण सर्वांना सक्तीचे करावे...


नवचैतन्य टाईम्स वाई (अमोल मांढरे)सैन्य प्रशिक्षण सर्वांना सक्तीचे करणे. हा  आपला एक महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय आहे. आज स्पर्धे बरोबर आणि आणि वाढत्या शहरीकरणात अनेक प्रश्न विकासाच्या आड येत आहेत. महागाई, बेरोजगारी, व्यसनाधीनता, वाढते प्रदूषण त्याचबरोबर दहशतवाद हा एक महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे. आपल्या देशाला  थोर महापुरुषांची पार्श्वभूमी आहे. याच महापुरुषांनी त्यांच्या जीवनात प्रत्येक वेळी देशविरोधी ताकदी पुढे शरणागती न पत्करता राष्ट्रगीत उद्दिष्ट समोर ठेवून लढा दिला आहे. सध्या आपल्या देशात काश्मीरपासून दहशतवाद आणि देशाच्या अन्य भागात नक्षलवादी ही एक प्रमुख आणि गंभीर समस्या आहे. आणि हीच प्रमुख समस्या आपल्या देशाच्या हिताच्या दृष्टीने चिंतेची आहे. तेव्हा युवकां बरोबरच सर्व नागरिकांनी यासाठी पुढे येऊन लढा देणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हां याचवेळी सैन्य प्रशिक्षण सर्वांना सक्तीचे करणे. याचा आपण सर्वांनी चर्चेतून आणि अभ्यासपूर्ण विचार करणे गरजेचे आहे. आणि त्यामुळे दहशतवाद सारख्या गंभीर प्रश्नाला उत्तरच ठरेल. सध्या आपल्या देशाची पोलीस यंत्रणा व सैन्यदल यांवर देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत ताण आहे. आणि यामुळेच या सर्वांना सहकार्य तर नक्कीच मिळेल. सध्या आपल्या केंद्र शासनाच्या व सुरक्षा यंत्रणेंच्या कडक धोरणामुळे दहशतवादावर चांगलाच वचक बसला आहे.त्याचबरोबर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत अत्यंत कठोर प्रतिउत्तर देऊन बऱ्याच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. परंतु लबाड पाकड्या दहशतवाद्यांना व त्यांच्या कारवायांवर विश्वास ठेवून चालणार नाही.त्यांच्यावर भविष्यात ही कायम प्रतिबंध ठेवणे गरजेचे आहे.. सैन्य प्रशिक्षणामध्ये विविध शस्त्रांचे प्रशिक्षण, गुप्तचर यंत्रणेचा वापर आणि माहितीची देवाण-घेवाण आणि दहशतवादाशी लढण्यासाठी एकसूत्रता या सर्व बाबींचा समावेश करावा लागेल. आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागाचा प्रभाव असलेल्या सैन्य भरती मध्ये शहरातील युवक व बौद्धिकदृष्ट्या प्राविण्य असलेल्यांचा सैन्य भरती मध्ये विशेष प्रभाव वाढेल. नागरिकांमध्ये सैन्य प्रशिक्षणामुळे  त्याची शारीरिक व मानसिक स्वास्थ्य नक्कीच वाढेल. आणि उत्तम व्यक्तिमत्व विकास होईल. सध्या शाळा-कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले तर त्यांची शारीरिक व मानसिक वाढ नक्कीच होईल.त्याचबरोबर ते त्यांच्या क्षेत्रात यशस्वी नक्कीच होतील. आणि हे समाजाच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल ठरेल. आपण सर्वांनी आपल्या इतिहासावर नजर टाकली तर आपल्याला नक्कीच कळेल की आपल्या महाराष्ट्राचे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले जनतेवर होणारे अन्याय आपल्या डोळ्यांनी पाहिला होता. आपल्या बळीराजा माता-भगिनी आणि जनतेवर होणारा जुलूम यासाठी त्यांनी परकीय आक्रमणाला लढा देणे ठरवले होते. आणि त्यांनी स्वतः पुढे येऊन एका हातात ढाल तर दुसऱ्या हातात तलवार घेऊन आपले स्वराज्यातील अठरापगड जातीचे शूर मावळ्यांना एकत्र करून आदर्श स्वराज्य निर्माण केले. आणि याच वेळी बलाढ्य परकीय आक्रमणाला तोंड देताना त्यांनी आपल्या गनिमी काव्याचा वापर केला. आणि आपल्या सर्वांना एका गोष्टीचा अभिमान नक्कीच वाटेल की त्यांचे याच गनिमी काव्याचा, आणि राजनीतीचा वापर आज जगातील बलाढ्य देश ही करत आहे. आपल्या जगाच्या इतिहासात भारतीय सैन्यदल एक विशेष परंपरा व आदर्श आहे. आपल्या भारतीय सैन्य दलाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही स्वतःहून दुसऱ्या देशावर आक्रमण केले नाही. परंतु जर आपल्या देशाला धोका असेल तर त्यास प्रत्युत्तर दिलेच आहे. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे इतिहासात याची गर्वाने नोंद आहे. आणि जगातील सैन्य दलाचा विचार केला तर भारताचा ही क्रमांक अग्रगण्य आहे. भारतीय सैन्य दलाला पराक्रमाची आणि शौर्याची एक अतुलनीय परंपरा आहे.आपले महाराष्ट्र राज्याला सबंध जगात सैन्य दलाची एक आदर्श परंपरा आहे.. आपल्या महाराष्ट्रातील जवानांची मराठा रेजिमेंट हे एक आदर्श आणि  महान पराक्रमाची रेजिमेंट आहे.छत्रपती शिवाजी महाराज की जय.या घोषणेत वीर जवान शत्रू राष्ट्राला नेस्तनाबूत करतात. आणि अशा या महान रेजिमेंटच्या आपल्या वीर जवानांनी आदर्श पुढे ठेवून सैन्य दलात भरती होईल .आपल्या भारत मातेचा गौरव वाढवावा.तेव्हा आपण सर्व नागरिकांनी याचा आपल्या भारतीय सैन्य दलाचा अभिमान बाळगून प्रशिक्षण घेण्यास स्वतः समोर यावे. तेव्हा समाजातील जाणकारांनी आणि शासनाने याचा गंभीरपणे विचार करावा योग्य तो निर्णय घ्यावा.. जय हिंद. जय भारत. जय जवान.
कविराज अमोल मांढरे. वाई.जिल्हा सातारा.
Mobile no.7709246740.