NC Times

NC Times

बसपाची बूतबांधणी अंतिम टप्प्यात,विविध ठिकाणी सेक्टर कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- बहुजन समाज पार्टीच्या वतीने येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री कुमारी मायावती यांच्या आदेशानुसार बूत स्तरावर कार्यकर्त्यांना जोडून बहुजन समाज पार्टीचा खासदार निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल चालू केली असून,या अनुषंगाने मतदारसंघात सेक्टर वाईस कार्यालयाचे उदघाटन करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार नागज,ढालगाव, चोरोची व सावळज येथील कार्यालयांची उदघाटने सांगली जिल्हा अध्यक्ष डॉ शंकरदादा माने यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी विविध मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
       सदर कार्यालयाच्या उदघाटनंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ शंकर माने म्हणाले की बहुजन समाजातील सर्व जनतेने एकत्रित येऊन आपला हाक्काचा खासदार निवडून आणला पाहिजे,आज पर्यंत या सत्ताधारी लोकांनी आपल्याला नाहक्क लुबाडण्याचे काम केले असून,यांनी देशामध्ये सध्या आहाकार माजवला आहे.हे सर्व थांबवण्यासाठी आपल्याला आपल्या राष्ट्रीय अध्यक्षा कुमारी मायावतीना देशाच्या प्रधानमंत्री करणे गरजेचे आहे.यासाठी सर्व बहुजन समाजाने एकत्रित येऊन काम करणे आवश्यक आसल्याचे सांगितले. 
      यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की सेक्टर नुसार कार्यालये सुरू करून या कार्यालयामध्ये जन सामान्याची कामे केली जाणार आहेत.त्याचप्रमाणे शासनामार्फत येणाऱ्या सर्व योजनाही येथे जनसामान्याला मोफत दिल्या जाणार आहेत.यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉ शंकरदादा माने,विधानसभा क्षेत्र अध्यक्ष उज्वला धोत्रे,बसपाच्या जिल्हा प्रभारी सविता माने,इरळीच्या सरपंच संजना आठवले,सामाजिक कार्यकर्ते मंगेश सावंत,शुभम चव्हाण,महीला तालुका अध्यक्षा राखी शिंदे,कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष सिद्धनाथ माने, अमोल वाघमारे,सुनिल खोत. विशाल कर्पे,जालिंदर मोहिते, सुभाष मराठे,संजय सनदी,गौतम कांबळे,प्रताप खोत,वैभव शिंदे. संतोष वनखडे,भानुदास आठवले,विजय माने,विशाल कांबळे.सुमित गाडे,संतोष वानखडे,प्रमिला कदम,सविता कदम,प्रियांका खोत,श्रीदेवी खोत,संगीता जाधव,लता साबळे. सुरेखा मोहिते,रेश्मा साठेसह बहुजन समाज पार्टी व बहुजन कामगार संघटनेतील कामगार, ग्रामस्थ,सभासद,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.