NC Times

NC Times

घाटनाद्रेत एकनाथ षष्ठी मोठ्या उत्साहात संपन्न


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील प्रगतशील शेतकरी नामदेव रामचंद्र शिंदे (गुरुजी) यांच्या घरी गावातील परंपरेनुसार श्री संत एकनाथ षष्ठी विविध उपक्रमसह मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.अगदी सकाळपासूनच याठिकाणी सदर कार्यक्रमाची लगबग दिसुन येत होती. 

अगदी सकाळपासूनच श्री संत एकनाथ महाराजांच्या अभंगच्या भजनासह भारुडाचेही सुवाद्यासह गायण करण्यात आले.दुपारी बाराच्या सुमारास प्रतिमा पुजनासह आरती करून पुष्पवृष्टी करण्यात आली.तर कार्यक्रमाची सांगता ही महाप्रसाद वाटपाने करण्यात आली.याचा लाभ तमाम भाविक भक्तांनी घेतला.कार्यक्रमाचे संयोजन नामदेव शिंदे,वैभव शिंदे,विष्णू शिंदे,सौ प्रमिला शिंदे,सौ पुजा शिंदे,कु विराज शिंदे,कु आदीराज शिंदे यांनी केले.