NC Times

NC Times

आरोग्यावर बोलू काही ....


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)-कान दुखणे - Ear Pain            कान दुखणे हा त्रास सर्वांनाच कधी ना कधी होत असतो विशेषतः लहान मुलांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात दिसून येतो. अनेक कारणामुळे कान दुखत असतात .यामध्ये प्रामुख्याने कानात झालेल्या इन्फेक्शन मुळे कान दुखत असतात. याशिवाय सर्दी झाल्यामुळे तसेच कानात मळ अधिक झाल्याने कान दुखू लागतो. यासाठी कान दुखण्याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय तसेच औषध उपचारांची माहिती डॉक्टर सतीश उपळकर यांनी या लेखात दिली आहे. कान दुखणे याची कारणे -      कानात बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे,                    सर्दी झाल्याने सायनस इन्फेक्शन मुळे ,                  हिरड्या सुजल्यामुळे,                                          कानात मळ अधिक झाल्याने ,                              कानाचा पडदा फाटल्यामुळे ,                                कानात काडी अथवा टोकदार वस्तू घालून जखम झाल्यामुळे कानात इंज्युरी किंवा मार लागल्याने कान दुखत असतो व वरीलपैकी कारणे हे कान दुखणे यासाठी कारणीभूत ठरू शकतात. कान दुखणे यावरील घरगुती उपाय लसूण - दोन ते तीन लसूण पाकळ्या बारीक करून मोहरीच्या तेलात गरम कराव्यात थंड झाल्यानंतर तेल गाळून घ्यावे. या तेलाचे दोन-तीन ड्रॉप्स दुखणाऱ्या कानात घालावे यामुळे कान दुखणे थांबण्यास मदत होईल .याशिवाय आपण लसून रसाचे काही थेंबही दुखणाऱ्या कानात घालू शकता .

कांदा -कांद्यामध्ये एंटीबॅक्टेरियल आणि ॲटीसेप्टिक गुण असतात. कांदा थोडा गरम करून त्यांचा चमचाभर रस काढावा .या रसाचे दोन-तीन ड्रॉप्स कानात दिवसातून तीन वेळा घातल्यास कान दुखणे कमी होते. आले-  कांदा आणि लसूण प्रमाणेच आलेही कान दुखणे यावर उपयोगी ठरते. आल्ल्याच्या रसाचे दोन ते तीन ड्रॉप्स कानात दिवसातून तीन वेळा घातल्यास कान दुखणे दूर होते हा आयुर्वेदिक उपाय कान दुखणे यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण आल्यामध्ये वेदना व सूज कमी करणाऱ्या आयुर्वेदिक गुणधर्म असतात. तुळशीची पाने-   तुळशीच्या पानाचा रस काढून त्यांचे काही थेंब दिवसातून दोन वेळा कानात टाकावी. हा घरगुती उपाय केल्यामुळेही कान दुखणे थांबते.