आरोग्यावर बोलू काही
March 05, 2024
नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे) रिकाम्या पोटी डाळिंब खाण्याचे फायदे... बरेच लोक आता आरोग्याबाबत खूप काळजी घ्यायला लागले आहेत.आरोग्य चांगल रहाव म्हणून बरेच लोक दिवसाची सुरुवात फळ खाऊन किंवा ज्यूस पिऊन करतात. मात्र,ज्यूसच्या तुलनेत फळ खाणच अधिक फायदेशीर मानल जात.कारण फळामधूनच डायट्री फायबर आणि अनेक पोषक तत्व शरीराला मिळतात.ज्यामुळे पचनतंत्र चांगल राहत.आता उन्हाळा सुरु झालाय.या दिवसामध्ये तुम्ही जर रिकाम्या पोटी डाळिंब खाल्ल तर याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. चला जाणून घेऊ रिकाम्या पोटी डाळिंब खाण्याचे काय फायदे मिळतात. ॲटीआँक्सीडेंट डाळिंबामध्ये पॉलिफेनोल्स नावाच फायटोकेमिकल्स अस जे आरोग्यासाठी फायदेशीर असत.डाळिंब रोज जर रिकाम्या पोटी खाल्ल तर शरीरातील पेशीना फ्री- रँडिकल्सच्या नुकसानापासून वाचवण्यास मदत मिळते.इतकच नाही तर रोज डाळिंबाच सेवन केल्याने इम्यूनिटी बूस्ट करण्यासही मदत मिळते. किडनी राहते हेल्दी.....
डाळिंबातील ॲटीआँक्सीडेंट किडनी स्टोनची समस्या दूर करण्यासाठी मदत करतात.तेच जर तुम्हाला किडनी निरोगी ठेवायची असेल तर डायएटमध्ये डाळिंबाचा समावेश करा.डाळिंब रिकाम्या पोटीच खाल्ल तर जास्त फायदा मिळेल. सूज होते दूर ..... डाळिंबामुळे शरीरातील सूज कमी करण्यासही मदत मिळते.कारण यात सूज कमी करणारे अनेक तत्व असतात.शरीरावर सूज असेल तर सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाच सेवन करा. अनेक आजार राहतात दूर ...... डाळिंबातील ॲटीमाइक्रोबियल गुण याला एक प्रभावी ॲटीबायोटिक बनवतात.ज्यामुळे संक्रमण आणि नुकसानकारक बँक्टेरियासोबत लढण्यास मदत मिळते.त्यामुळे तुम्हाला हेल्दी रहायच असेल तर डाळिंबाच सेवन नियमित करा.