NC Times

NC Times

महिला दिनाचे औचित्य साधून सातारा येथील धंनजय गाडगीळ महाविद्यालयात विविध कार्यक्रम सोहळा संपन्न


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे) दिनांक - 07/03/2024 रोजी सातारा शहर पोलिस स्टेशन हद्दीतील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महा विद्यालय सातारा या ठिकाणी  मा.उपविभागीय पोलीस अधिकारी मा .राजीव नवले सो. यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक यांनी प्रत्यक्ष जाऊन महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींना व  महिला शिक्षक वर्ग यांना निर्भया बाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले, प्रमुख पाहुणे म्हणून मा.सौ. मल्लिका पाटणकर प्रमुख उपस्थित होत्या त्यानी मानसिक आजार या बाबत मार्गदर्शन केले.    महिला सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था तसेच मुलींचे होणारे छेडछाड या बाबत  कलमान्वये माहिती दिली.सदर कार्यक्रमात  विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाबाबत माहिती देऊन मोबाईल फोनचा वापर करताना कशाप्रकारे काळजी घ्यावी..,डायल 112 बाबत  सविस्तर माहिती दिली त्याच प्रमाणे निर्भया मोबाईल नंबर 8432841443 देऊन काही अडचण असल्यास संपर्क साधनेस सांगितले व लेखी तक्रारी अर्ज देणेबाबत सांगितले. त्याचप्रमाणे सायबर क्राईम बाबत सविस्तर माहिती दिली .

तसेच निर्भया पथक व महिला सक्षमीकरण फाउंडेशन (पथक पाचवड) यांचे संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील वसतिगृह मध्ये असलेले मुलींना सेल्फ डिफेन्स बाबत शिबिर घेऊन स्वतःचे स्वसंरक्षण कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमास निर्भया पथक स्टाफ     कॉलेज चे प्रा. कुरकुटे मॅडम तसेच सर्व महिला प्रा.शिक्षक वर्ग होता तसेच सेल्फ डिफेन्स बाबत शिबिर घेणे साठी वाई येथून आलेले ट्रेनर - डॉ.अरुण राजपुरे यांनी स्वसंरक्षणाचे विद्यार्थ्यांना धडे दिले  .यावेळी निर्भया पथक सातारा स्टाफ महिला पोलिस रेश्मा सोनावणे सहाय्यक पोलीस फौजदार संजय बगाडे, पो.कॉ.संकेत माने ,पो कॉ.समाधान बर्गे,व शाळेतील प्राध्यापक वृंद तसेच 
सातारा शहर पोलिस ठाणे मधील महिला समुपदेशन केंद्र मधील तनया घोरपडे मॅडम ह्या उपस्थित होत्या.