NC Times

NC Times

मोबाईल टॉर्चच्या उजेडात तहसीलदारांचे काम पत्रकारांची तहसिलदार यांच्या कामकाजावर स्तुतीसुमने तालुक्यातुन आश्चर्य व्यक्त


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)-मोबाईलच्या उजेडात तहसीलदारांनी केल्या सुनावण्या, अन मोबाईलच्या उजेडात उरकल्या तब्बल 96 सुनावण्या, आटपाडी तहसीलदारांची तत्परता, नागरिक समाधानी. या आणि अशा शीर्षकासह भल्या मोठ्या समजल्या जाणाऱ्या दैनिकांमध्ये प्रचंड अनुभवी पत्रकारांच्या बातम्या झळकल्या पेपर मध्ये आलेल्या बातम्या त्यानंतर समाज माध्यमावरती सुद्धा अनेक नागरिकांनी सदर कामाची प्रशंसा केली.
 सदर बातमीमध्ये अशी माहिती देण्यात आली होती मंगळवारी लाईट नव्हती परंतु त्यादिवशी तीन वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तहसीलदारांच्या समोर असलेल्या खटल्यांच्या सुनावण्या घेण्यात आल्या यामध्ये तीन ते आठ या वेळेत 96 सुनावण्या उरकण्यात आल्या पाच तासाच्या कालावधीमध्ये 96 सुनावण्या म्हणजे सरासरी एका सुनावणीला तीन मिनिटांचा वेळ याचाच अर्थ हा वेळ दोन्ही पक्षकारांना वाटून दिला तर दीड मिनिटाचा वेळ मिळतो दीड मिनिटांमध्ये एक सुनावणी पूर्ण होणे हे किती मोठं काम आहे हे आपल्या लक्षात आले असेलच
याहीपेक्षा मोठा पराक्रम आसा आहे की हे काम दिवसा मोबाईलच्या उजेड्यात करण्यात आलं. आता मोबाईलचा उजेड का पडण्यात आला याबद्दलही आपल्याला माहिती असायला पाहिजे.

 शासकीय कामकाज वीज नाही म्हणून थांबू नये म्हणून तहसील कार्यालयासाठी 2021 मध्ये सोलर सिस्टम बसवण्यात आलेला आहे. त्याच्यावरती खर्च किती झाला आहे माहित नाही परंतु साधारणपणे हा आकडा काही लाखांच्या घरात नक्कीच आहे. आता हे सोलर सिस्टम असताना मोबाईल च्या उजेडामध्ये काम करण्याची वेळ का आली हेही बातमी देत असताना तपासायला हवे होते. परंतु चमकोगिरीची सवय लागलेल्या चमकोगीरांनी चमकोगिरी करत साहेबांना खुश करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी दिव्याखाली अंधार असतो ही म्हण कधी वाचली नसावी असंच वाटतंय.
 वास्तविक पाहता या बातमीमध्ये तहसीलदारांनी केलेलं काम किती मोठा आहे यापेक्षा तहसीलदारांना मोबाईल वरती काम का करावं लागलं याचा मागवा घेतला असता तर ही फजिती झाली नसती.
 हे सोलर सिस्टम सध्या काम करत नाही असं तहसील कार्यालयाकडून समजतं. शिवाय हे सोलर सिस्टम मेंटेन करणारी कंपनी ही पुण्याची आहे व ही कंपनी प्रशासनाला दाद देत नाही असंही सांगितलं जातं. ह्या गोष्टी वरती प्रकाश टाकणं गरजेचं असताना फक्त चमकोगिरी करण कोणाला फायदा पोहोचवण्यासाठी ही चमकोगिरी करण्यात आली आहे हेही तपासण्याची गरज आहे. तहसीलदारांच्या केबिनमध्ये सुनावणी सुरू असताना चोरून फोटो काढायचा आणि त्याची प्रसिद्धी करायची व साहेबांची मर्जी जिंकायची आणि आपला हेतू पूर्ण करून घ्यायचा हे या टोळक्याने अनेक वर्षापासून दुकान चालू ठेवला आहे. हे सामान्य जनतेने सुद्धा ओळखलेलं आहे. फक्त आतापर्यंत उघड कोणी बोलत नव्हतं त्यामुळे अशा ह्या टोळक्याचं दुकान आजपर्यंत चालू होतं. मात्र या दुकानाला घरघर लागली आहे. त्यामुळे नको त्या गोष्टी उजेडात आणायच्या आणि श्रीमुख सुजवून घेणे आणि तो चांगल्या कामाचा प्रसाद दिला आहे. म्हणून लोकांमध्ये सांगायचं असा प्रकार सध्या सुरू आहे