NC Times

NC Times

खरसुंडी मंडळात राज्यस्व अभियान मेळावा उत्साहात संपन्न

 
नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)खरसुंडी  मंडल अंतर्गत खरसुंडी येथे झरे नेलकरंजी गोमेवाडी खरसुंडी घरनिकी आनंद या सजेतील वीस गावांसाठी महाराज राज्यस्व मेळावा उत्साहात संपन्न झाला यावेळी एका छताखाली लोकांना सर्व शासकीय सेवा देण्यात आल्या हा मेळावा सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होता महसूल प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या मेळाव्यात शासना च्या वतीने घेण्यात येणाऱ्या या मेळाव्यात शासनाचे सर्व विभाग सहभागी होते यावेळी लाभार्थ्यांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ देण्यात आला यामध्ये रेशनिंग कार्ड नावे लावणे कमी करणे सहा प्रकरणे मतदार यादी नाव लावणे गोल्डन कार्ड आभा कार्ड तहसीलदार उत्पन्न दाखले आधार कार्ड व दिव्यांग मूकबधिर सर्कल चौकशी करणे

 सातबारा अशी प्रमाणपत्रे व दाखले वितरित करण्यात आले यावेळी पुरवठा निरीक्षक श्री दादासाहेब पुकळे मंडल अधिकारी श्री कमाल मुलानी सर्व तलाठी सेतू चालक महा ई सेवा केंद्रप्रमुख सी एस सी केंद्रप्रमुख खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य व परिसरातील सर्व नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते