NC Times

NC Times

माझे मनोगत....


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)                                                              स्मरणशक्ती... एक शाप की वरदान हा माझ्या मनाला पडलेला नेहमीचा प्रश्न आहे.कारण स्मरणशक्तीचा संबंध आपल्या आठवणी शी आहे...आणि आठवणी आपला आयुष्यभर आपला पिच्छा सोडत नाहीत.       आठवणी..त्या मग चांगल्या,वाईट ...आनंदाच्या ...प्रेमाच्या..मायेच्या.असंख्य असतील,त्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात राहून जातात.                                     त्या आठवणी एखाद्याला आयुष्यभर त्रास देतात..आनंद देण्यासाठी नसतातच या आठवणी...आनंद घेणारा आज मधे जगत असतो...जो आज मध्ये जगत नाही त्याला मागच्या आठवणी त्रास देतात.                                     पण माझ्या मते तो भाग्यवान ज्याची स्मरणशक्ती खुप कमजोर आहे....तो सहजासहजी त्यातून बाहेर निघू शकतो.पण त्याने काय करायचे,ज्याची स्मरणशक्ती तीक्ष्म आहे... 
ज्याला चांगले, वाईट सगळे प्रसंग लहानपणा पासून लक्षात आहेत? कितीही प्रयत्न केले तरी तो विसरु शकत नाही ?     त्या सगळ्या चांगल्या वाईट आठवणींचा त्याच्या आयुष्यावर परिणाम होणार नाही का ? किती आठवणी असतील, हजारो, लाखो, दर दिवशी तर त्याच्या मनावर, बुध्दिवर आघात केले असतीलच, पण मनात, डोक्यात घर करुन राहिल्या असतील....                                                तरी तो माणूस जगात अगदी साधारण माणसा सारखा वावरतोय ...आजुबाजुच्या लोकांना कळत पण नाही की तो या आयुष्य पर्यत कोणत्या स्थितीतून गेला असेल...पण त्याच्या मनात काय चाललय हे कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही....                                                हेच आजच्या जगाचे दुर्देव आहे...सगळे आपआपल्या जगत,आपापल्या विश्वत,आपल्याच अहंकारात,आपल्याच मान अपमानामध्ये गुंग आहेत.                                      हे वाढतच जाणार आहे आणि हे जगाला कुठे घेऊन जाईल माहित नाही...                                                    थकतील लोक आपल्यातुन,आणि जेव्हा वेळ मिळेल दुसऱ्या व्यक्तिकडे त्याच्या नजरेतून बघण्याचा तेव्हा काहीतरी होईल...नाही तर आत्महत्या, निराशा, डिप्रेशन, चालूच राहणार..