NC Times

NC Times

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत तिसंगी जि प शाळेचा संघ उपविजेता


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)- नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा तिसंगी (ता कवठेमहांकाळ) येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी लहान गट मुले खो-खो या सांघिक खेळ प्रकारात उपविजेतेपद मिळवले असुन त्याना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.त्यांच्या या यशाचे परिसरातून चांगलेच कौतुक केले जात आहे.               दिनांक २७ व २८ मार्च दरम्याने नव कृष्णा व्हॅली कुपवाड (ता मिरज) येथील क्रिडा मैदानावर खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत प्रत्येक सामन्या गणीक या संघाने अगदी उत्कृष्ट कामगिरी केली.सेमीफायनलमध्येही या संघाने बलाढ्य अश्या कवठेपिरान येथील जिप शाळेच्या संघाला सहज पराभूत करून अगदी दिमाखात फायनल मध्ये प्रवेश केला. 
 परंतु अंतिम सामन्यात मात्र या संघाची गाठ फेडरेशनमध्ये खेळणार्या विसापूर (ता तासगाव) येथील अत्यंत बलाढ्य संघाशी पडली.येथेही झालेल्या अत्यंत चुरशीच्या व अगदी उत्कंठा वाढविणार्या सामन्यात मात्र या संघास अगदी निसटत्या पराभवास समोर जावून उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 
 अगदी प्रथमच या जिल्हा स्तरीय लहान गट खो-खो स्पर्धेत तिसंगी जि प शाळेने कवठेमहांकाळ तालुक्याचे नेतृत्व केले होते.त्यामध्ये हे यश मिळवून दिले.तसेच येथे झालेल्या या विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत कवठेमहांकाळ तालुक्याने जनरल चॅम्पियन्सशिप मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. 
तिसंगी जि प संघास मुख्याध्यापिका सौ सुवर्णा वठारे,उपशिक्षक संतोष पाटील,गिरीधर सावंत,सौ सुवर्णा पाटीलसह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,सदस्य व पालकांचे यथोचित मार्गदर्शन लाभले.