NC Times

NC Times

थबडेवाडीत मरगुबाई,लक्ष्मी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे /वार्ताहर(जालिंदर शिंदे)-थबडेवाडी (ता कवठेमहांकाळ) येथे पडझड व अगदी जिर्ण झालेल्या मरगुबाई व लक्ष्मीदेवीच्या मंदिराचा संपूर्ण लोकवर्गणीतून पाच लाख रुपये निर्धारित खर्चात जिर्णोद्धार करण्यात आला.त्यामुळे भाविक भक्तांमध्ये व ग्रामस्थांतून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे. 
 गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी,माजी सैनिक,गलाई व्यवसायीक व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून अतिशय रेखीव व देखणे असे हे मंदिर उभारले आहे.पुर्वी हे मंदिर दगडमाती पासुन तयार केलेले व पुर्णतः पडझड झालेल्या अवस्थेत हे मंदिर होते. 
परंतु या देवी विषयी पंचक्रोशीतील लोकांच्या मध्ये मोठी श्रध्दा आहे.अगदी नवसाला पावणारी देवी म्हणूनही ओळखली जाते.सालाबादाप्रमाणे आषाढ महिन्यात येथे देवीची मोठी यात्रा भरवली जाते.एका बैठकीतच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरले होते.त्याप्रमाणे वर्गणी गोळा केली असता तब्बल पाच लाख रुपये निर्धारित खर्चातून हे मंदिर उभारले गेले.त्यामुळे चालू वर्षी आषाढ महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.