NC Times

NC Times

घाटनांद्रेतील शाळांची सामुदायिक प्लास्टिक निर्मुलन मोहीम संपन्न


नवचैतन्य टाईम्स  घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्हाभर सुरू असलेल्या प्लास्टिक निर्मुलन मोहीमेस प्रतिसाद देत घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथेही सर्वोदय हायस्कूल,जिल्हा परिषद शाळा घाटनांद्रे,जिल्हा परिषद शाळा खाडेगोरे मळा,जाधव मळासह गावातील पदाधिकारी,ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी यांनीही सामुदायिक रित्या संपूर्ण गावातून प्लास्टिक निर्मुलन रॅली काढत गावातील प्लास्टिक एकत्रित गोळा केले व त्याची शासकीय नियमानुसार विल्हेवाट लावली. 
सदर रॅलीने संपूर्ण गावात फिरुन कित्येक टन प्लास्टिकचे संकलन केले.यावेळी उपस्थितांनी प्लास्टिक निर्मुलना बाबत घोषणाही दिल्या.तदनंतर सर्वोदय हायस्कूलच्या प्रांगणात छोटीशी प्लास्टिक निर्मुलना बाबत कार्यशाळाही पार पडली.
यावेळी बोलताना सरपंच अमर शिंदे म्हणाले की सध्या पर्यावरणाचा होत असलेला र्हास त्याचबरोबर वातावरणात दिवसेंदिवस वाढत असलेली वाढती उष्णता त्याचा मानवी व प्राणीमात्रांच्या आरोग्यावर मोठा वाईट परिणाम होत आहे.यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे प्रत्येकाचेच आद्य कर्तव्य असुन त्यासाठी प्लास्टिक निर्मुलन होणे हे तितकेच गरजेचे आसल्याचे सांगितले.तर आज माणसाला घरा बाहेर पडताना शुद्ध पाण्याची बाटली घेऊन जावे लागते जर अशीच परिस्थिती राहीली तर उद्या स्वताच्या पाठीवर शुद्ध हावेचे नळकांडे घेऊन बाहेर पडावे लागेल त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचेच मत पर्यावरणा विषयक अभ्यासक प्रविण शिंदे यांनी सांगितले.तर दिलीप खाडे यांनी मोजक्याच पण पर्यावरणा विषयक महत्वाच्या गोष्टी आधोरीकेत केल्या. 
        यावेळी गावातील विविध पदाधिकारी,सर्व शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक,शिक्षक,पालक व व ग्रामस्थ,आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी आभार ग्रामसेवक झैलसिंग पावरा यांनी मानले.