आरोग्यावर बोलू काही
March 07, 2024
नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे) गुडघेदुखी म्हणजे काय ? गुडघेदुखी म्हणजे की आपण आपल्या डोळ्यासमोर वयस्कर व्यक्तींना आणतो.पण अलीकडच्या काळामध्ये तरुण वयामध्ये सुध्दा या त्रासास सामोरे जावे लागते..... बदललेली जीवनशैली,व्यायामाचा अभाव,व्यस्त जीवनामुळे तसेच त्रास अंगावर काढण्याच्या सवयीमुळे गुडघेदुखीवर सुरुवातीपासून दुर्लक्षित केल्याने अखेर,शेवटच्या टप्यातील गुडघ्याला अथ्राटीस जडल्याचे निष्पन्न होते.जिथे डॉक्टरांकडून सांधे बदलायचे म्हणजेच आँपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो.चला तर जाणून घेऊयात गुडघेदुखी म्हणजे नक्की काय ? कारणे... गुडघे दुखी व संधिवात हा आजार वयोमानानुसार होणारा आजार आहे जसे व्यक्तीचे वय वाढत जाते त्याप्रमाणे सांध्यातील कुच्यांची झीज होत जाते त्यामुळे गुडघेदुखी होते. व्यायामाचा अभाव,बैठी जीवनशैली आणि लठ्ठपणा. लठ्ठ व्यक्तीच्या वजनामुळे गुडघ्यावर अतिरिक्त भार निर्माण होऊन कुच्यांची झीज होते. गुडघ्यांच्या ठिकाणी आघात(मार,फँक्चर)झाल्यामुळे सुध्दा गुडघे दुखू शकतात. गुडघ्यांच्या सांध्यांत संक्रमण झाल्यामुळे देखील गुडघेदुखी होऊ शकते. अस्थींचे अथ्राटीस यामध्ये तुमच्या गुडघ्यातील सांध्यामधील तंतू जाड होतात.आणी कार्टिलेजची क्षती होते...... संधिवातात्मक अथ्राटीस एक स्वय प्रतिरोध अवस्था आहे. ज्यामध्ये प्रतिरोध प्रणाली शरीराच्या स्वतःच्या तंतू नष्ट करते.त्यामुळे संपूर्ण शरीरातील सांध्यात वेदना व त्यांची क्षती होते. गाऊट ही सांध्याची एक वेदनामय अवस्था आहे जी शरीरातील युरिक ॲसिड वाढल्यामुळे होते.
लक्षणे... गुडघ्यामध्ये प्रचंड वेदना होतात.रुग्णाला दररोजची कामे करतानाही त्रास होतो. सांधे दुखावणे,साध्यांची हालचाल मंदावणे. सांध्यावर सूज येणे व सांधे आखडणे. चालल्यावर गुडघेदुखी वाढणे व आराम केल्यास बरे वाटणे. उठायला व बसायला त्रास होणे. गुडघेदुखीचा त्रास जास्त वाढल्यास,योग्य उपचार न केल्यास पेशंटचे गुडघे वाकडे झालेले पहायला मिळतात. निदान.... शारीरिक तपासणी X-ray CT scan USG MRI प्रतिबंधात्मक उपाय.... आहारात कँल्शिअम घटकांचा समाविष्ट करणे. व्यायाम करणे वजन वाढू न देणे