NC Times

NC Times

घाटनांद्रेत ग्राम आरोग्य समितीची कार्यशाळा संपन्न




नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरात ग्राम स्तरीय जन आरोग्य समीती व ग्राम आरोग्य पोषण आहार,पाणी पुरवठा तसेच स्वच्छता समितीची संयुक्त बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच अमर शिंदे होते.यावेळी आरोग्य,पाणी पुरवठा व स्वच्छता यावरील अडचणी व त्यावर उपाय यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. 



प्रारंभी घाटनांद्रे आरोग्य उपकेंद्राच्या डॉ विद्या पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना गावातील आरोग्य उपकेंद्रा मार्फत दिल्या जाणाऱ्या आरोग्य विषयक सुविधा विषयी यथोचित माहिती दिली.तर तालुका आरोग्य समन्वयक शिवाजी कांबळे यांनी आरोग्य विषयक येणाऱ्या समस्या व त्यावर केली जाणारी उपाययोजना यावर उपस्थितीतांना मार्गदर्शन केले.
तर अध्यक्षीय भाषणात सरपंच अमर शिंदे यांनी आरोग्य,पोषण आहार,स्वच्छता व पाणीपुरवठा याविषयी ग्रामपंचायत कटीबद्ध आसल्याचे सांगुन आरोग्य,पाणी        पुरवठा,स्वच्छता समिती विषयी येणाऱ्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्न रहातील असे सांगीतले.यावेळी उपसरपंच सुनील कांबळे,डॉ गणेश खोत,शुभम सर्वोदय,विनायक कुडचे,सौ प्रियांका वायचळ यांनीही उपस्थीतीतांना मार्गदर्शन केले.सरपंच अमर शिंदे,डॉ गणेश खोत,डॉ विद्या पाटील,सौ दिव्या शिंदे,सौ पवित्रा शिंदे,सौ राजश्री शिंदे,सौ वैशाली कांबळे,सौ प्रियांका वायचळ,विनायक कुडचे,सौ माधुरी पवार,बाळू आठवले,राजेंद्र पाटीलसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार सुनील कांबळे यांनी मानले.