NC Times

NC Times

पित्त होण्याची कारणे आणी उपाय

 
नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)          आहार... तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ, लाल मांस, या प्रकारचे अन्नपदार्थ आपण खाल्ले असतील तर हमखास पित्त होऊन छातीत जळजळ होते.                  अपेय पान... आयुर्वेदात अपेय पान वर्ज्य सांगितले आहे चहा, कॉफी, अल्कोहोल, निगोटीन युक्त पदार्थ म्हणजेच दारू, सिगारेट सतत सेवन केल्यास पित्त वाढते.            ऊन सहन न होणे...    जर आपण तीव्र उन्हात काम करत असाल आणि तुमच्या शरीराला ऊन सहन झाले नाही तर शरीरातील पित्त वाढू लागते.                          भावनिक ताण...    कोणत्याही गोष्टीचा अती विचार करून भावनिक ताण-तणाव आला असेल तर पित्त दोष उद्भवतो. 

                                                        पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय                                
अमृत फळ आवळा...   चवीला तुरट असा आवळा कफ आणि पित्त प्रकोप कमी करणारा आहे. त्यामधील व्हिटँमिन सी अन्ननलिका, पोट स्वच्छ ठेवते. पित्ताचा त्रास होत असेल तर कच्चा आवळा थोडे मीठ लावून खाऊ शकता.आवळ्याचे चूर्ण करून ते कोमट पाण्यातून घेऊ शकता. हा उपाय काही दिवस सकाळी केल्यास पित्तविकार कमी होतो.        मुग आणि तांदूळ... जर तुम्हाला पित्त झाल्याने भूक लागत नसेल किंवा जळजळ होत असल्याने काय खावं कोणता आहार घ्यावा हे समजत नसेल तर मुगाचं साधं वरण आणि भात त्यावर तूप घालून काही दिवस घ्यावा. मूग पित्तशामक आहे. तसेच साधा मूग आणि तांदळाचा निर डोसा देखील खाऊ शकता. तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.                                           उष्ण आलं रसदार लिंबू... आपल्या मनाती आलं  उष्ण तिखट आहे पण पूर्वीपासून आल्याचा पित्तशामक म्हणून वापर होतो. आल्यातील तिखट पाचक रसाने वाढलेले आम्लपित्त कमी होते. लिंबाचा रस त्यातील व्हिटँमिन सी मुळे पित्त स्वस्थ होते. जेवणात आलं घ्यावं. तसेच आल्याचा तुकडा किसून मीठ, लिंबाचा रस, किंचित साखर घालून हे सरबत चमचाने थोडं थोडं पीत रहाव.              कोकम... आमसूल किंवा कोकम काही घरात सहज उपलब्ध असते. त्यामध्ये देखील प्रचूर व्हिटॅमिन सी असते कोकम सरबत किंवा आमसूल सेवन करून पित्त शमंत होते                थंड दूध..... थंड दूध वाढलेली जळजळ कमी करते थोडेसे थंड दूध किंचित खडीसाखर घालून प्यायल्यास पित्त कमी होते. छाती आणि पोटातील जळजळ थांबते.                पिकलेले केळे... केळ्यातून शरीराला खूप जास्त पोटॅशियम मिळतात. त्यामुळे केळ खाल्ल्यास पोटातील आम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते तसेच शरीराला फायबर मिळते जे पचनक्रिया वेगवान करण्यास मदत करते.