NC Times

NC Times

माझे मनोगत ...


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)                        खुप दिवसांनी आज लिहायचा योग आलाय योग म्हणजे वेळ एकटा होतो ना,एकांत पण होता म्हणून तर प्राँब्लेम होता.त्यातूनच हे विचार आले.तसे हे विचार खुप दिवसा पासून होते मनात पण ते दुसऱ्याच्या म्हणन्यावरुन आज जेव्हा माझ्या मनात तेच विचार आले तेव्हा लिहावेसे वाटले मी आत्तापर्यत समजावून सांगत होतो की कोणी एकटा नसतो,जर समजले तर विश्वास ठेवला तर कोणी ना कोणी तरी आपल्या बरोबर असते.                          पण आज असा प्रश्न आहे की असे वाटते की त्यांनाच हे समजत नाही ते खरच एकटे आहेत की स्वतःला त्यांना एकटे रहायचे की त्यांना एकांत पाहिजे.? या तिन्ही संकल्पनेमध्ये समजले तर खुप फरक आहे,नाहीतर काहीच नाही.                                              पहिल्या प्रकारात एकटे पडणे हे पूर्णतःस्वतःवर अवलंबून असते.तुमच्या मानसिकतेवर ते अवलंबून आहे..आपण कोणावर विश्वास ठेवत नाही,कोणाला जवळ करत नाही, त्यामुळे सगळे मनात ठेवतो मग होणाऱ्या त्रासाला दुसऱ्याला दोष देतो की मला कोणी समजुन घेत नाही, मी एकटा पडलोय/पडलेय.यामध्ये खुप चिडचिड, निराशा येऊ शकते.                दुसऱ्या या स्थिती मध्ये असे असते की त्यांना स्वतःला एकटे रहायचे असते.कोणीच आपल्या साठी काही करु नाही अस त्यांचा ठाम विश्वास असतो.त्यामुळे ते कोणाशी काही मोकळे पणाने सांगणार पण नाहीत आणि ठरवून टाकणार मनाशी की आपल्यासाठी कोणीही नाही.                                              आपणच आपल्या साठी आहोत बस कधी कधी या स्थितीत माणूस खुप खंबीर होतो आणि त्याला कोणाची गरज नाही वाटत.पण हे त्या वेळेपुरते असते.नंतर त्यांचे उसने अवसान उतरुन जाते आणि कोणाची गरज भासु लागते आणि जे जवळचे असतात.त्यांना मग ते दोष देऊ लागतात की मला गरज असताना कुठे होतात तुम्ही मी एकट्याने/एकटीने केले सामना सगळ्याचा.                                     तिसऱ्या स्थितीत एकांत हवा असतो लोकांना एकांत हा एकटे पणा पेक्षा वेगळा आहे.एकांत म्हटला तर पॉजिटिव्ह आहे बघितला तर निगेटिव्ह आहे.व्यक्ती जर डिप्रेशन मध्ये असेल आणि जर त्याला एकांत पाहिजे असेल तर ते धोकादायक पण हाच एकांत काही कल्पनात्मक करण्यासाठी असेल तर तो खुप फायदेमंद....                                            हा एकांतात रमतो तो कलेसाठी तो एकांत महत्त्वाचा बाकी एकटे पणा हा पूर्ण आपल्या मनावर अवलंबून आहे.तो एकटे पणा म्हणून घ्यायचा की एकांत म्हणून घ्यायचा हे तुमच्या क्रिएटिव्ह मनावर अवलंबून आहे.