NC Times

NC Times

सांगली लोकसभा लढणारच विशाल पाटील यांचा निर्धार


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख) सांगली लोकसभा मतदारसंघाची काँग्रेस पक्षाची जागा ही काँग्रेस पक्षालाच मिळावी, या आणि विशाल पाटील यांच्या उमेदवारीच्या मागणीकरिता आज पलूस कडेगावचे लोकप्रिय आमदार, काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री माननीय डॉ. विश्वजीत पतंगराव साहेब यांनी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेतेमंडळी व उमेदवार विशाल पाटील यांना घेऊन काँग्रेस पक्षाचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी आदरणीय के. सी. वेणूगोपाल जी यांची भेट घेतली. सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसलाच उमेदवारी मिळावी यासाठी सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या भावना या वेळी डॉ. कदम साहेब यांनी व्यक्त केल्या. यासंदर्भात पुन्हा महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे नेते आदरणीय उद्धव जी ठाकरे यांना विनंती करून ही जागा काँग्रेसला देण्यात यावी अशी आग्रही मागणी डॉ. कदम साहेब यांनी या वेळी केली.
सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. सांगली लोकसभा ही काँग्रेसलाच मिळावी ही आम्हा नेते मंडळीसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे. यासाठी यापूर्वीही काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडे मागणी केली आहे, असे डॉ. कदम साहेब यांनी स्पष्ट केले.
यावेळी माननीय डॉ. कदम साहेब यांच्यासमवेत काँग्रेस पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष आ. विक्रम दादा सावंत, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.