NC Times

NC Times

नवनीत राणा यांना भाजपकडून अमरावती लोकसभेची उमेदवारी जाहीर

 
नवचैतन्य टाईम्स अमरावती (प्रतिनिधी)  नवनीत राणा यांना भाजपकडून अमरावतीतून उमेदवारी जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे नवनीत राणा कमळावर लढणार हे स्पष्ट झालं आहे. नवनीत राणा अमरावतीच्या विद्यमान खासदार आहेत. भाजपने आज सातवी यादी जाहीर केली.
नवनीत राणा आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्या तातडीने नागपूरसाठी रवाना झाल्या आहेत.
अमरावतीत तगडी फाईट मिळणार आहे. आनंदराव अडसूळ, बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. ही राजकीय आत्महत्या असल्याचे आनंदराव अडसूळ म्हणाले. तर १०० टक्के नवनीत राणा यांना पाडणार असं बच्चू कडू म्हणाले.
आनंदराव अडसूळ यांनी अमरावती लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले. त्यामुळे महायुतीत फूट पडल्याचे दिसून येत आहे. 
काहीही करा पण नवनीत राणा यांना तिकीट देऊ नका, अशी विनंती भाजप नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. मात्र आता नाराजी स्विकारत भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे.
भाजप अमरावती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले होते. भाजपच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच अमरावती लोकसभा जागेवर कमळ चिन्हावर निवडणूक होणार आहे.
कोण आहेत नवनीत राणा?
नवनीत राणा राजकारणात आल्यानंतर आल्या. सर्वप्रथम त्यांनी NCP पक्षात प्रवेश केला आणि २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली पण त्या निवडणूक हरल्या. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद अडसूळ यांचा पराभव करून अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार बनले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता. नवनीत राणा यांना ५१०,९४७ मते मिळाली. तर शिवसेनेचे उमेदवार आनंद अडसूळ यांना ४ लाख ७३ हजार ९९६ मते मिळाली.