NC Times

NC Times

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आटपाडी तालुक्यात डोंगरी विभाग विकास योजनेत समाविष्ट करणेत यश...


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)-
आटपाडी तालुक्यातील 20 गावांचा विकास योजनेत सहभाग झाले असुन आटपाडी तालुक्यातील औटेवाडी, कामथ, कानकात्रेवाडी, चिंचाळे, घरनिकी, घाणंद, विभूतवाडी, जांभुळणी, धावडवाडी, नेलकरंजी, पारेकरवाडी, पिंपरी बुद्रुक, मुढेवाडी, वाक्षेवाडी, वलवण, बाळेवाडी, मानेवाडी, मिटकी, तळेवाडी, हिवतड या गावांचा डोंगरी विभाग विकास योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे

याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाकडून 13 मार्च रोजी निर्गत करण्यात आला आहे तालुक्यातील या गावांचा डोंगरी विभाग विकास योजनेत समावेश झाल्याने या गावांना त्याचा मोठा लाभ होणार आहे आमदार पडळकर यांनी आटपाडी तालुक्यातील या गावांचा योजनेमध्ये समावेश व्हावा म्हणून वारंवार पाठपुरावा केला होता या पुराव्याला यश आल्यानंतर संबंधित गावातील नागरिकांनी पडळकर यांच्या प्रयत्नाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत