NC Times

NC Times

कवठेमहांकाळ मध्ये एम डी ड्रग चा कारखाना उद्ध्वस्त १०० किलोच्या आसपास एम डी ड्रग ताब्यात


नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी      (जगन्नाथ सकट)
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथील एका शेतामध्ये एम डी ड्रग चा सुरू असणारा कारखाना मुंबई क्राइम ब्रँचने उद्ध्वस्त केला असून १०० किलोच्या आसपास एम डी ड्रग ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे तालुक्यातील इरळी येथील एका शेतामध्ये एम डी ड्रगचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून मुंबई क्राइम ब्रँचचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे हे रविवार रात्री पासून येथे आपल्या पथकासह ठाण मांडून बसले होते एम डी ड्रगच्या कारखान्यावर आज त्यांच्या पथकाने छापा टाकला असून मुद्देमाल तपासण्याचे व ताब्यात घेण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे परवा कुपवाड येथे ३०० कोटी रुपयाचा तब्बल १४० किलो एम डी ड्रगज चा साठा पकडला त्या पाठोपाठच कवठेमहांकाळ तालुक्यात कारखाना आढळल्याने तालुक्यात खळबळ माजली असून या कारखान्याचा मालक तालुक्यातील ढालेवाडी गावचा येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे