NC Times

NC Times

आरोग्यावर बोलू काही...


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे) -कोण सांगतं रात्री भात खाल्ला की पोट सुटतं ?तांदूळ शिजवताना तीन गोष्टी लक्षात ठेवा वजन वाढणार नाही...           जर तुम्ही वजन कमी (वेटलॉस )करण्याच्या प्रयत्नात असाल तर लोक तुम्हाला भात न खाण्याचा सल्ला देतील याच कारणामुळे भात कितीही आवडत असेल तरीही लोक भात खाण टाळतात. भारतात दक्षिणेला सगळ्यात जास्त भात खाल्ला जातो साउथ इंडियाचे फेमस पदार्थ जसं की इडली डोसा, अप्पम, खीर,आप्पे, या सगळ्याच पदार्थांमध्ये तांदूळ हा मुख्य घटक आहे. तिथल्या जास्तीत जास्त पदार्थात तांदूळ असतो. (बेस्ट वे टू इट राईस) पण इतका भात खाऊनही त्याचे पोट का सुटत नाही असा प्रश्न अनेकांना पडतो.एक्सपर्टसच्या मते भात खाताना पोर्शन कंट्रोल म्हणजेच तुम्ही किती भात खाताय हे सुद्धा महत्त्वाचे असते आयुर्वेद वाचस्पती वैद्य परीक्षित शेवडे यांनी नवचैतन्य  सखीशी बोलताना भात खाण्याबद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करत भात कसा खावा,कसा शिजवावा याबाबत सांगितले आहे डॉक्टर परीक्षित शेवडे सांगतात "रोजच्या स्वयंपाकात भात शिजवताना काही बेसिक गोष्टीची काळजी घ्यायला हवी. जसे की तुम्ही वापरत असलेला तांदूळ हा जुना असावा किमान वर्षभर जुना असलेला तांदूळच वापरावा. जर तांदूळ जुना नसेल तर तांदूळ शिजवण्याआधी कोरडे तांदूळ परतून घ्या. यामुळे तांदळातील एक्स्ट्रा स्टार्च निघून जाईल आणि ग्लायसेमिक इंडेक्सही कमी होईल. भात शिजवताना कुकर ऐवजी ओपन वेसल्सचा वापर करा ज्यामुळे भात जास्त पौष्टिक होईल" वरण-भात, तूप,लिंबू बेस्ट कॉम्बिनेशन... डॉक्टर परिचित यांच्यामते महाराष्ट्रीयन जेवणाची पद्धत वरण-भात तूप -लिंबू हे बेस्ट कॉम्बिनेशन आहारात असेल तर कोणताही त्रास उद्भवणार नाही. कारण यातील घटक तुपातील फॅटी ऍसिड, लिंबातील ऍसिटिक ऍसिड यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो आणि भाताचे पोषण मूल्य अधिक वाढते

भात आणि पोट सुटण्याचा काही संबंध आहे का...                                      भारतात ९० टक्के लोकांचे स्टेपल डायट हे भात आहे.पूर्वी पासून भात खाणाऱ्या सगळ्या लोकांची पोट सुटलेली होती असं नाही.पूर्वी  अंग मेहनत खूप व्हायची,आता ती होताना दिसत नाही म्हणून पोट सुटण्याचं प्रमाण वाढलं आहे.तुम्ही व्यायाम करणार नाही आणि फक्त भात बंद कराल,यामुळे पोट सपाटीला जातील असं अजिबात होणार नाही.भात योग्य पध्दतीने शिजवल्यास भात खाण्याचा कोणताही त्रास होणार नाही आणि पोटही सुटणार नाही.यासाठी नियमित व्यायामाची सवय ठेवा.