आरोग्यावर बोलू काही...
March 09, 2024
नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे) फक्त ४ योगासन करा-मुलांची उंची वाढेल ताडमाड,तब्येतही सुधारेल! उंची वाढवण्याचा खास उपाय... योगा शरीराच्या बाहेरील नाही तर आतील आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो.मुल कितीही खातात तरी अंगाला लागत नाही.बारीक दिसतात त्यांची उंची वाढत नाही अशी अनेकांची तक्रार असते.खालील योगासनं करुन तुम्ही मुलांची उंची वाढवण्यासाठी मदत करण्यात मदत करु शकता. मुलांची उंची कमी असेल आणि तुम्हाला मोठे झाल्यानंतरही त्यांची उंची कमी राहील अशी भिती असेल तर काही योगासनांची मदत घेऊन तुम्ही उंची वाढवू शकता.... १) चक्रासन.. उंची वाढविण्यासाठी रोज चक्रासन करण्याचा सल्ला दिला जातो.चक्रासन करण्यासाठी तुम्हाला जमीनीवर पाठीवर झोपावे लागेल.त्यानंतर पाय गुडघ्यात मोडून आणि हात कानांजवळ घेऊन मोडा.त्यानंतर हात आणि पायांच्या मदतीने शरीर जमीनीपासून वरच्या बाजूने उचला.हे शरीराच्या चक्राप्रमाणे दिसेल. चक्रासन केल्याने उंची तर वाढतेच पण शरीराची लवचीकतासुध्दा वाढते. 2) ताडासन..... मुलांसाठी ताडासन करण प्रभावी मानलं जात.ताडासन करण्यासाठी जमीनीवर सरळ उंभ राहा .त्यानंतर दोन्ही पायाचे पंजे आणि टाचा चिटकवून उंभ राहा.त्यानंतर हात एकत्र जोडून शरीर वरच्या बाजूला खेचा ५ते ८वेळा दीर्घ श्वास घ्या.नंतर सामान्य स्थितीत या. ३) पश्चिमोत्तासन ..... पश्चिमोत्तासन करण्यासाठी जमीनीवर दोन्ही पाय समोर पसरवून बसा.गुडघे हलके वरच्या बाजूला उचला.त्यानंतर पाठ सरळ करत समोर आणा हात सरळ करत पायांच्या पंज्यांना स्पर्श करा.दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या.काहीवेळासाठी या स्थितीत होल्ड करुन सामान्य स्थितीत या.रोज हे योगासन केल्याने शरीर व्यवस्थित स्ट्रेच होते. ४) धनुरासन... या आसनाला बो पोज असही म्हणतात.कारण यात शरीर धनुष्याप्रमाणे दिसते.धनुरासन करण्यासाठी पोटावर झोपा.त्यानंतर पाय आणि हात वर उचला.काही वेळ या स्थितीत राहा त्यानंतर सोडून द्या.धनुरासन केल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघतात आणि पचनक्रियाही चांगली राहते.शरीराची प्लेक्सिबिलिटी वाढून उंची वाढण्यासही मदत होते.