NC Times

NC Times

राष्ट्रनिर्माण साठी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व परिपूर्ण विकास महत्त्वाचा


नवचैतन्य टाईम्स वाई (अमोल मांढरे)आज आपण सर्वजण वाढत्या स्पर्धेला सामोरे जात आहोत. इतर क्षेत्रांत बरोबर विशेष शैक्षणिक क्षेत्रातही आमूलाग्र बदल होत आहेत. व त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी नवनवीन आव्हाने उज्ज्वल भवितव्यासाठी एक सोनेरी संधी च घेऊन आलेली आहे.
पूर्वीपासूनच आपल्या भारत देशात शिक्षणाची ख्यातनाम विद्यापीठे व शैक्षणिक केंद्रे आपल्या देशातील काय तर जगातील विद्यार्थ्यांना आकर्षित करत होती. आणि यामधूनच शिक्षण घेऊन यशस्वी होणारे विद्यार्थी सबंध जगभर आपल्या भारत देशाचे महात्म्य दाखवत आहेत. आणि यामधूनच विज्ञान ,संगणक,कला वाणिज्य ,क्रीडा आरोग्य ,समाजशास्त्र, राज्यशास्त्र त्याचबरोबर पत्रकारिता अशा विविध क्षेत्र विद्यार्थ्यांना ज्ञानाचे संकलन करण्यासाठी खुणावत आहेत. तेव्हा याच अनमोल संधीचा विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्वक आकलन करून योग्य तो निर्णय घ्यावा व आपले उज्वल भवितव्य घडवावे. आजचे यशस्वी विद्यार्थीच उद्याचा आपले भारत देशाचे आधारस्तंभ आहेत. परंतु या बरोबरच समाजात काही बिकट प्रश्न विकासाच्या आड येत आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांनी हे गांभीर्याने पुढे येऊन स्वतःबरोबर समाज तत्व देशहितासाठी खंबीरपणे पुढे येणे अत्यावश्यकच आहे. आज आपण एकविसाव्या शतकात केलेली प्रगती आणि पूर्वीपासूनच भारत देशाला असणारी एक भारतीय संस्कृती यांचे योग्य तो समतोल राखणे हे विद्यार्थ्यांच्या आद्यकर्तव्य च आहे. मेक इन इंडिया चे महत्व, स्वदेशीचा पुरस्कार, प्रौढ साक्षरता, पर्यावरण संवर्धन, त्याचबरोबर कोरोना वर उपाय अशा विविध प्रश्नांना सामोरे जाऊन विद्यार्थ्यांनी त्याचे समाजात प्रबोधन करणे योग्य ठरेल. त्याचबरोबर जागतिक पातळीवर या समस्यांसाठी आपल्या भारत देशाचे खंबीर भूमिका त्यांनी नक्कीच मांडवी. यासाठीच शासनानेही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे त्यांच्या शैक्षणिक खर्चास मदत करणे ,त्याचबरोबर आपल्या भारत देशातच स्थिर होण्यासाठी त्यांच्या बौद्धिक क्षमतेला योग्य तो वाव आणि सन्मान देणे हे एक सकारात्मक पाऊल ठरेल. त्यामुळे विद्यार्थी पश्चिमात्य देशांच्या प्रलोभनाला आकर्षित न होता आपल्या देशातच राहून आपल्या देशाचे उज्वल भवितव्य घडवतील. त्याच बरोबर एक महत्त्वाचा विषय म्हणजे विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्राबरोबरच शारीरिक व मानसिक या दोन्हींच्या परिपुर्ण विकासासाठी शिक्षण द्यावे. त्यामध्ये विविध शास्त्राचे प्रशिक्षण, माहितीची देवाण-घेवाण त्याच बरोबर आदर्श राजनीति अशा विविध विषयांमध्ये त्यांना परिपूर्ण ज्ञान देऊन त्यांचे व्यक्तिमत्व घडवावे. त्यामुळेच आपले देशातील वाढता दहशतवाद, इतर गंभीर प्रश्न, त्याचबरोबर सीमेवरील शत्रू राष्ट्रांचे असलेले तणावपूर्ण संबंध यास रोखठोक उत्तर मिळेल. विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्या याच प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम राहिला तर त्यांचे भवितव्य उज्ज्वल व परिपूर्ण होईल. हल्लीच्या शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या एक गंभीर प्रश्न म्हणजे अपयशी विद्यार्थी हे नैराश्यात जातात व त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. आणि अपयशी विद्यार्थ्यांनी सुद्धा खंबीरपणे संकटाला सामोरे जाऊन यशाला खेचून आणण्याची क्षमता स्वतः मध्ये हीआहे हे मनात ठसविले पाहिजे. विद्यार्थ्यांची आवड व क्षमता याचा सारासार आणि योग्य विचार करूनच प्राथमिक शिक्षणापासूनच त्यांना त्यांच्या मर्जीनुसार शैक्षणिक क्षेत्र निवडण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे. हल्ली दहावी व बारावीनंतर विविध शाखेची महाविद्यालय ,प्रवेश परीक्षा, कलचाचणी या सर्वांमध्ये विद्यार्थ्यांना जणू आपल्याकडे ओढण्याची स्पर्धाच लागलेली दिसून येत आहे. तेव्हा विद्यार्थी व पालकांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता अभ्यासपूर्वक नियोजन करून विद्यार्थ्यांचे भविष्यातील योग्य ते क्षेत्र निवडावे. त्याचबरोबर आपल्याला ज्या महापुरुषांची आदर्श पार्श्वभूमी आहे त्यांच्या आत्मचरीत्र, त्यांची थोर शिकवणूक त्याचबरोबर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असलेल्या विविध संतांची काव्य ग्रंथ ,यांचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करून विद्यार्थ्यांना एक आदर्श समाज घडविण्यासाठी प्रोत्साहित करावे. त्याचबरोबर शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कडे सुद्धा परिपूर्ण प्राविण्य आहे. व त्यांना फक्त योग्य तो संधी व परिपूर्ण मदत देणे हे, आपल्या सर्वांचे एक आद्य कर्तव्यच आहे. याचाच विचार करता स्पर्धापरीक्षा मध्येही ग्रामीण युवकांना योग्य ते संधी दिली तर त्याचा ही आपल्या समाजाच्या परिपूर्ण विकासासाठी नक्कीच मदत मिळेल. तेव्हा विद्यार्थ्यांनी ही स्वतः खंबीरपणे पुढे येऊन आपल्या पालकांबरोबर समाजहितासाठी कार्य करावे.  शिक्षण म्हणजे एक वाघिणीचे दूध हेच आहे आणि त्याचे फळ भविष्यात नक्कीच मिळते. हे विद्यार्थ्यांनी मनात ठसवून घ्यावे.व त्याचबरोबर उत्तम आर्थिक वेतन, समाजात प्रतिष्ठा आणि लोक सेवा करण्याची संधी या त्रिसूत्रीचा युवकांनी सारासार विचार करून देश हित हे एक मात्र उद्दिष्ट पूर्ण करावे..
त्याचबरोबर एक गंभीर बाब म्हणजे विद्यार्थ्यांना दहावी व बारावीनंतर इतर शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेताना भरमसाठ आर्थिक पिळवणूक व विविध समस्यांना सामोरे जावे लागते. सर्वच ठिकाणी आहे पण काही मर्यादित शैक्षणिक संस्थांच्या बाजारीकरणामुळे शैक्षणिक क्षेत्राकडे बघण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन नकारात्मक होत आहे. तेव्हा शासनाने या गंभीर प्रश्नाचा विचार करून अशा शैक्षणिक संस्थांवर कठोर कारवाई करावी. आणि त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना सढळ हाताने आर्थिक मदत द्यावी.  आणि आपल्या भारत देशात गुरू-शिष्याचे नाते पवित्र मानले जाते. सर्व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असताना आपले गुरुजनांचा आदर व अभिमान बाळगावा. या चांगल्या कार्यामध्ये शासनाबरोबरच समाजातील जाणकार नागरिक, लोकप्रतिनिधी व विविध सामाजिक संस्था यांनीही विद्यार्थ्यांना त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे. त्याचबरोबर मी एक साहित्यिक आणि लेखक म्हणून माझे कर्तव्य जाणून माझ्या लेखणीने समाजातील युवकांना विद्यार्थ्यांना व सर्व स्तरातील नागरिकांना त्यांचे कर्तव्य सांगून समाजप्रबोधनाचे कार्य निपक्ष व निर्भीडपणे चालूच ठेवीन. आणि त्यामुळेच आपण सर्व पत्रकार बांधवांनी ही कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता भारत मातेसाठी आपले सर्वस्वी आयुष्य अर्पण करूच आणि त्याचबरोबर आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नसून त्यामध्ये अनेक महापुरुषांचे आणि स्वातंत्र्यवीरांचे त्याग व अतिव बलिदान आहेच आणि त्याचबरोबर आपल्या देशाच्या अनमोल स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शहिदांची किंमत आपण सर्व युवक वर्गाने कधीही न विसरता त्याचे पावित्र्य व आदर्श कायम राखणारच हीच शपथ आज आपण सर्व घेऊ या. व त्यामुळेच आपला भारत देश हा जगाच्या पाठीवर एक महासत्ता म्हणून नक्कीच उदयास येईल यात तिळमात्र शंका नाही.
जय हिंद जय भारत. जय महाराष्ट्र.
भारत माता की जय.
भारत माता की जय.
 धन्यवाद.
कविराज अमोल मांढरे वाई जिल्हा सातारा.
Mobile no.7709246740...